काम देण्यासाठी डायरेक्टरने झरीन खानसमोर ठेवली होती ‘ही’ घाणेरडी अट; झरीननेच केला खुलासा

बॉलिवूडच्या ग्लॅमसर दुनियेत कास्टिंग काऊच हा प्रकार काही नवा नाही. चित्रपटात काम देण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते, कास्टिंग डायरेक्टर, डायरेक्टर अभिनेत्रींकडून वेगवेगळ्या मागण्या करत असतात. आता पर्यंत अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचबद्दल खुलासे केले आहे.

आता असाच एक खुलासा प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खानने केला आहे. झरीन खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते, पण सध्या ती बॉलिवूडपासून लांब आहे. अशात तिने एक मुलाखत दिली होती, या मुलाखतीत झरीनने कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव सांगितला आहे.

झरीन खानने पिंकविलाला एक मुलाखत दिली होती. त्यावेळी झरीनने तिच्या आयुष्याबद्दल आणि बॉलिवूडबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली आहे. तेव्हा तिने कास्टींग काऊचबद्दलचा अनुभव सांगितला आहे.

एका डायरेक्टरने मला किसिंग सीन देण्यासाठी त्याच्यासोबत रिहर्सल करण्यासाठी सांगितले होते. पण मी तिथेच त्या डायरेक्टरला नाही म्हटले होते, असा धक्कादायक अनुभव झरीन खानने सांगितला आहे.

झरीन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण सलमान खानच्या वीर चित्रपटापासून केले होते. बॉलिवूडमध्ये एँट्री झाल्यानंतर लोकांनी तिची तुलना कटरिना कॅफसोबत करण्यास सुरुवात केली.

कटरिनासोबत तुलना झाल्यानेच तिला बॉलिवूडमध्ये आपले करियर बनवता आले नाही आणि त्यामुळेच ती सध्या बॉलिवूडपासून लांब आहे. वीर, अक्सर २, हेट स्टोरी ३, हाऊसफुल २, वजह तुम हो, १९२१ अशा चित्रपटांत झरीन खानने काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

वॉशिंग मशीन मध्ये घुसला कोल्हा; नंतर कोल्ह्याने केले असे काही की
“औरंगजेबाला स्वप्नात जसे शिवाजी महाराज दिसायचे, तसे चंद्रकांत पाटलांना अजित दादा दिसतात”
करिश्मा कपूरच्या अगोदर ‘या’ चार अभिनेत्रींनी ‘दिल तो पागल है’ चित्रपटाला दिला होता नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.