फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे वय सहजासहजी ओळखायला येत नाही. म्हणून तर अनेक अभिनेते ५० पास केले. तरी त्यांचे सहजासहजी समजत नाही.म्हणून त्यांच्यासोबत अनेक अभिनेत्री काम करतात. कारण त्यांच्या वयातील अंतर दिसून येत नाही.
म्हणून बॉलीवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी वडील आणि मुलगा दोघांसोबतही काम आहे. जाणून घेऊया बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी वडील आणि मुलगा दोघांसोबतही रोमान्स केला आहे.
१) डिंपल कपाडीया – बॉबीसारख्या सुपरहिट चित्रपटात काम करणाऱ्या डिंपल कपाडीयाने देखील पिता आणि मुलगा या दोघांसोबत काम केले आहे.
डिंपल कपाडीयाने विनोद खन्नासोबत बटवारा, खुन का कर्ज अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तर त्यांचा मुलगा अक्षय खन्नासोबत ‘दिल चाहता है’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी देखील खुप जास्त पसंत केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता.
२)श्रीदेवी – श्रीदेवीला बॉलीवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या मनमोहन अंदानी प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षे राज्य केले आहे. यासोबतच त्यांनी बॉलीवूडमधल्या वडील आणि मुलगा या दोघांसोबतही काम केले आहे.
श्रीदेवीने धर्मेंद्रसोबत ‘नाकाबंदी’ या चित्रपटामध्ये काम केले आहे. तर त्याचा मुलगा सनी देओलसोबत रामअवतार आणि चालबाझ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोघांसोबतही श्रीदेवीला खुप जास्त पसंत केले गेले होते.
३)माधूरी दिक्षीत – बॉलीवूडची लेडी अमिताभ बच्चन म्हणून माधूरीची ओखळ आहे. माधूरीने तिच्या डान्सने आणि अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. माधूरीने विनोद खन्नासोबत ‘दयावान’ चित्रपटामध्ये काम केले आहे. तर त्यांनी अक्षय खन्नासोबत ‘मोहोब्बत’ या चित्रपटामध्ये काम केले आहे.
४) जया प्रदा – ८० च्या दशकातील बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री जया प्रदा यांचे नाव देखील ह्या यादीत येते. जया प्रदाने गंगा तेरे देश में, शहजादे, फरिश्ते या चित्रपटात धर्मेंद्रबरोबर काम केले आहे. तर त्यांनी धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल यांच्यासह वीरता आणि जबरदस्त सारख्या चित्रपटांमध्येही मुख्य भुमिका साकारल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून राहूल रॉय आणि पुजा भट्टचे ब्रेकअप झाले होते
मराठमोळी ऊर्मिला मातोंडकर कशी झाली बॉलीवूडची ब्युटी क्वीन
जाणून घ्या सध्या नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध झालेली रश्मीका मंदाना नक्की कोण आहे?
जाणून घ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत महालक्ष्मीची भुमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीबद्दल