इम्रान हाश्मीसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर देखील अभिनेत्रीचे करिअर झाले फ्लॉप; पहा कोण आहे ती अभिनेत्री

बॉलीवूडमध्ये जन्नत गर्लच्या नावाच्या प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सोनल चौहानला सर्वजण ओळखतात. सोनलला कोणत्याही ओळखीची गरज नाही. सोनलने इम्रान हाश्मीसोबत ‘जन्नत’ चित्रपटामध्ये काम केले होते. पहील्याच चित्रपटातून सोनल खुप प्रसिद्ध झाली होती.

जन्नत चित्रपटातील सोनलच्या अभिनयाचे खुप जास्त कौतूक करण्यात आले होते. त्यावेळी लोकांना वाटत होते की, सोनल बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री होणार. तिने तिच्या सुंदरतेसोबतच अभिनयाने देखील लोकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. पण फिल्म इंडस्ट्रीतील तिचे स्थान ती जास्त दिवस टिकवू शकली नाही.

जन्नत चित्रपटानंतर सोनलला खुप जास्त प्रसिद्धी मिळाली होती. तिने त्यानंतर अनेक चित्रपट देखील केले. पण तिला खास यश मिळू शकले नाही. आज ती लाइमलाईटपासून दुर आयूष्य जगत आहे. जाणून घेऊया सोनल चौहानच्या आयूष्याबद्दल काही रोचक गोष्टी.

सोनमचा जन्म १६ मे १९८७ ला उत्तर प्रदेशच्या बुदंल शहरात झाला होता. सोनलचे कुटूंब साधेसूधे नाही. सोनलचा जन्म एका राजेशाही कुटूंबात झाला होता. मणिपूरच्या राजपूत घराण्यात सोनलचा जन्म झाला आहे. त्यामूळे ती सुरुवातीपासूनच राजकूमारी होती.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदर सोनल मॉडेलिंग करत होती. सोनल चौहान पहीली अशी भारतीय आहे जिने २००५ मध्ये मिस वर्ल्ड टुरिज्मचा ताज जिंकला आहे. मॉडेलिंगसोबत सोनमला अभिनयात देखील रुची निर्माण झाली होती. तिने हिमेश रेशमियाच्या आप का सुरुर अल्बममधून अभिनयात प्रवेश केला होता.

जन्नत चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सोनमला पहील्यांदा एका हॉटेलमध्ये पाहीले होते. पाहताच क्षणी दिग्दर्शक कुणाल देशमूखला सोनममध्ये त्यांच्या जन्नत चित्रपटाची अभिनेत्री दिसली आणि त्यांनी सोनमला चित्रपटाची ऑफर दिली. सोनमने देखील या संधीचा फायदा घेतला.

जन्नत चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. त्यासोबतच तिने २००९ चा सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार देखील जिंकला होता. सोनमचे हे यश बघून लोकांना वाटत होते की, ती बॉलीवूडची यशस्वी अभिनेत्री होणार. पण असे होऊ शकले नाही.

जन्नतनंतर सोनमने पहला सितारा, ३जी, पलटन, बुड्डा होगा तेरा बाप असे अनेक चित्रपट केले. पण तिचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. तिला अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये यश मिळाले नाही. त्यामूळे तिने साऊथ चित्रपटांकडे मोर्चा वळवला.

सोनमने तामिळ, तेलगू, कन्नड भाषांच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. पण तिकडेही तिला यश मिळाले नाही. ती साईड रोल करु लागली. अभिनयात यश मिळत नव्हते. म्हणून तिने अभिनय क्षेत्रापासून दुर जाण्याचा निर्णय घेतला. आज ती लाइमलाईटपासून दुर राहते.

सोनम सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. तिचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. ती अभिनयात यशस्वी होऊ शकली नसली. तरी ती चाहत्यांच्या मनावर आजही राज्य करते. सोनम अजून अविवाहीत आहे. सध्या करिअरकडे लक्ष देत आहे.

महत्वाच्या बातम्या –
विवाहित असताना देखील अभिनेत्रींच्या प्रेमात पागल झाले होते ‘हे’ अभिनेते
इंजीनियर आहेत बॉलीवूडचे ‘हे’ चमकते सितारे; नाव वाचून धक्का बसेल
विश्व सुंदरी मानूषी चिल्लर लवकरच करणार बॉलीवूडमध्ये डेब्यू; ‘या’ चित्रपटात करत आहे काम
टीव्हीवरील सेलिब्रिटी रस्त्यावर विकतायेत भाजीपाला; त्यांच्यावर अशी वेळ का आली? वाचा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.