टेलिव्हिजनवर मोठा ब्रेक मिळण्याअगोदर ‘या’ अभिनेत्रींनी बी ग्रेड चित्रपटांमध्ये केले आहे काम

फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही कलाकाराला रातोरात स्टारडम मिळत नाही. काही कलाकार दिवस रात्र मेहनत करत असतात. तर काही कलाकार अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर इंडस्ट्रीमध्ये नाव कमवतात. अभिनेत्रींना तर त्यासाठी खुप जास्त मेहनत करावी लागते.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणे अभिनेत्रींसाठी सोपे नसते. त्यांना सहजासहजी यश मिळत नाही. वर्षांनूवर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना काम मिळत असते. काही अभिनेत्रींनंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले होते. जाणून घेऊया अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये यश मिळण्याअगोदर बी ग्रेड चित्रपट केले आहेत.

रश्मि देसाई – टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री रश्मि देसाईने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध नाव आहे. उतरन मालिकेतून रश्मिला खरी ओळख मिळाली होती. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली. तिने नच बलियेसारख्या कार्यक्रमामध्ये देखील सहभाग घेतला होता.

पण हे सगळं यश मिळण्याअगोदर तिने बी ग्रेड चित्रपट केले होते. ये लम्हे जुदाई केसारख्या बी ग्रेड चित्रपटांमध्ये तिने काम केले होते. त्यासोबतच तिने भोजपूरी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. त्यात तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. पण आज ती टेलिव्हिजनवरील सर्वात सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री आहे.

अर्चना पुरण सिंह – टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध नाव अर्चना पुरण सिंहचे नाव देखील या यादीत येते. त्यांनी देखील करिअरच्या सुरुवातीला बी ग्रेड चित्रपट केले होते. आज त्या टेलिव्हिजनवरच्या प्रसिद्ध जज आहेत. त्यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्ष लागले.

अर्चनाला श्रीमान श्रीमती, कॉमेडी सर्कस, द कपिल शर्मा शो सारख्या कार्यक्रमांमूळे त्यांना छोट्या पडद्यावर ओळख मिळाली. पण ही ओळख मिळण्याअगोदर त्यांनी बी ग्रेड चित्रपट केले होते. त्यासाठी त्यांना अनेक वाईट गोष्टी ऐकाव्या लागल्या. ही इमेज तोडण्यासाठी त्यांनी खुप मेहनत घेतली.

उर्वशी ढोलकिया – टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका कसौटी जिंदगीमध्ये खलनायकाची भुमिका करणाऱ्या उर्वशी ढोलकियाने देखील बी ग्रेड चित्रपट केले होते. त्यांची स्वप्नम ही बी ग्रेड फिल्म खुप हिट झाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक बी ग्रेड चित्रपट केल. पण त्यांना टेलिव्हिजनने खरी ओळख मिळवून दिली.

दिशा वकानी – टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री दिशा वकानीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये यश मिळवण्यासाठी खुप मेहनत केली होती. आज त्यांना भारतच नाही तर सगळ्या जगात दया भाभीच्या भुमिकेसाठी ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात ओळख निर्माण करणाऱ्या दया भाभीने एकेकाळी काम मिळवण्यासाठी खुप कष्ट केले होते.

एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या फिल्म करिअरची सुरुवात एका बी ग्रेड चित्रपटातून केली होती. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत दया भाभीची भुमिका करण्याअगोदर त्यांनी बी ग्रेड चित्रपट केले. त्यात त्यांनी अनेक हॉट आणि इंटीमेट सीन्स दिले होते. पण त्यानंतर त्यांनी दया भाभीची भुमिका केली आणि त्यांचे आयूष्य बदलून गेले.

महत्वाच्या बातम्या –
विराट कोहलीच्या अगोदर ‘या’ क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अनूष्का शर्मा
बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायकांनी केले आहेत दोन लग्न; जाणून घ्या कोण कोण आहे या यादीत?
पत्नी वेळ देत नाही म्हणून तिच्या वागण्यावर पतीला आला संशय; घरात कॅमेरा बसल्यावर समोर आले ‘हे’ कारण
एकेकडे डिंपल कपाडीया आणि राजेश खन्नाचे लग्न सुरु होते तर दुसरीकडे डिंपलच्या आई रडत बसल्या होत्या कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.