निगेटिव्ह भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचा झाला होता दुर्दैवी शेवट; ‘हे’ होते कारण

आपल्या कणखर आवाजाने आणि परखड स्वभावाने अनेक कलाकारांनी सिनेसृष्टी आपल स्थान निर्माण केल. त्यातीलच एक प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री म्हणजे पद्मा चव्हाण होय. पण फार काळ त्यांचे करियर नव्हते. मात्र जेवढे काही चित्रपट केले ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

७ जुलै १९४४ रोजी कोल्हापूर येथे पद्मा चव्हाण यांचा जन्म झाला. बालपणापासूनच पद्मा यांना अभिनयाची आणि नृत्याची आवड होती. त्यांनी केत्लेयांनी फक्त प्राथमिक शिक्षण घेऊन शाळा सोडली. त्यांना चंदेरी दुनियेची ओढ लागली होती. वडील अण्णासाहेब चव्हाण नवीन विचारांचे असल्याने त्यांनी लेकीला कधी कोणत्या गोष्टीला विरोध केला नाही.

Padma Chavan - IMDb

बोलके डोळे, सुरेख चेहरा आणि परखड व्यक्तिमत्व याव्यतिरिक्त कलाकाराला आणि काय हवं! या सर्व गोष्टींमुळेच की काय पण पद्मा यांना जास्त स्ट्रगल करावं लागल नाही. १९५९ साली म्हणजेच वयाच्या १५व्या साली पद्मा यांना भालजी पेंढारकर यांच्या ‘आकाशगंगा’ चित्रपटात काम मिळाले.

Ashok Saraf, Padma Chavan, Devghar - Marathi Scene 5/18 - YouTube

पद्मा यांनी चित्रपटांसोबतच रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांच्या दिलखेचक आणि बिंधास्त अभिनय तसेच अप्रतिम सौदर्य यांमुळे त्या ओळखल्या जावू लागल्या. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ‘महाराष्ट्राची मर्लिन मनरो’ आणि ‘सौदर्याचा अँटम बॉम्ब’ हे किताब आचर्य अत्रे यांनी बहाल केले.

Padma Chavan - Alchetron, The Free Social Encyclopedia

पद्मा यांनी अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केले. ‘गुंतता हृदय हे या नाटकातील कल्याणी, माझी बैको माझी मेव्हणी मधील रसिका, लग्नाची बेडी मधील रश्मी, नवऱ्याची धमाल तर बाईकोची कमाल मधील सुनिता अश्या अनेक भूमिका त्यांच्या लोकप्रिय ठरल्या. तसेच त्यांच्या अप्रतिम भूमिकेमुळे प्रेक्षकांनी त्यांची नाटके अक्षरशा डोक्यावर घेतली.

अश्यातच १९६६ साली दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्यासोबत पद्मा यांचा विवाह झाला. पद्मा यांनी आकाशगंगा, अवघा संसार, जोतिबाचा नवस, लाखात अशी देखणी अश्या अनेक मराठी चित्रपटांत काम केले. सुमारे २८ मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले. तसेच मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी हिंदी सिनेमातही आपला ठसा उमटवला.

Ramesh Dev, Padma Chavan, Dost Aasava Tar Asa | Marathi Movie Scene 13/23 - YouTube

पद्मा यांनी बहुदा निगेटिव्ह भूमिकाच केल्या. १९७५ साली ‘या सुखानो या’ आणि १९७६ साली ‘आराम हराम है’ या चित्रपटांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. त्या काळात त्या अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर होत्या, अश्यातच १२ सप्टेंबर १९९६ साली मोटार अपघातात अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे दुर्दैवी निधन झाले.

हे ही वाचा-

ऑस्ट्रेलियाचा पराभव करणारा रिअल लाईफमधील कबीर खान कोण आहे? कशी घेतली मेहनत, वाचा

मोदींनी हॉकी सेमीफायनल मॅच पाहिली आणि भारत हरला, लोकं मोदींना म्हणाले, ‘पनवती’

शिवसैनिकांनी अदानी एअरपोर्टचा बोर्ड फोडला, आता अदानी समूहाने घेतला मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.