सुशांत प्रकरणी आणखी एका अभिनेत्रीने केला खुलासा; दाखवली बाॅलीवूडची काळी बाजू

गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलीवूडमध्ये नेपोटिझमचा मुद्दा गाजत आहे. यावरुन वेगवेळ्या प्रकारचे वाद निर्माण झाले आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडची काळी बाजू लोकांसमोर येत आहे.

बॉलीवूडमधील नेपोटिझम आणि ड्रग्ज प्रकरण सध्या खुप जास्त चर्चेत आहे. बॉलीवूडमधील नेपोटिझम, आउटसाइडर्सना दिली जाणारी वागणूक या सर्व गोष्टींवर कलाकारांनी आपली मते मांडली आहेत. तर अनेक कलाकारांनी त्यांचा बॉलीवूडमधला अनूभव सांगितला आहे.

आत्ता या यादीत अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नावाचा समावेश झाला आहे. उर्वशीने एका मुलाखतीमध्ये तिचा बॉलीवूडमधील अनूभव सांगितला आहे. उर्वशी बॉलीवूडमध्ये बाहेरुन आलेला चेहरा आहे. या अगोदर तिच्या कुटूंबाचा बॉलीवूडशी काहीही संबंध नव्हता.

त्यामूळे उर्वशाने नेपोटिझमच्या मुद्यावर तिचे मत व्यक्त केले आहे. ती म्हणाली की, ‘कोरोनामूळे या वर्षी बॉलीवूडचे रुप बदलले आहे. मला आलिया भट्ट अभिनेत्री म्हणून आवडते. तिचा अभिनय खुप उत्तम असतो. पण IMDB वर ‘सडक 2’ पेक्षा चांगले रेटिंग माझा चित्रपट ‘व्हर्जिन भानूप्रिया’ला देण्यात आले आहे’.

काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘खाली पिली’ चित्रपटापेक्षासुद्धा माझा ‘व्हर्जिन भानूप्रिया’ चित्रपट बराच चांगला आहे. मला माहीती आहे मीडीयाची एक वेगळी बाजू असते. पण इंडस्ट्रीमध्ये बाहेरुन आलेल्या कलाकारांना छोट्या मोठ्या गोष्टींसाठी टार्गेट केले जाते. बाहेरुन आलेल्या कलाकारांचा वापर फक्त टिआरपी मिळवण्यासाठी केला जातो. असे देखील उर्वशी म्हणाली’.

उर्वशाने सांगितले की, ‘इंडस्ट्रीत नवीन असाल किंवा तुम्ही बाहेरुन आलेले असाल तर तुम्हाला टार्गेट केले जाते. मी इंडस्ट्रीत नवीन होते तेव्हा माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जायच्या. पण त्यावेळी मी नवीन असल्यामूळे मला माध्यमांना समजवायला वेळ नव्हता. या सर्व खोट्या अफवा सेलिब्रिटींना हानी पोहोचवतात. स्टार किड्सबद्दल अशा अफवा पसरवल्या जात नाहीत’.

‘माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी ह्रतिक रोशनसोबत रात्री २ ते ४ या वेळेत बोलते अशी अफवा पसरवण्यात आली होती. मी ह्रतिकची चाहती आहे. मला त्याचे काम आवडते. पण ती अफवा खोटी होती. असाच काही त्रास सुशांत सिंग राजपूतला देखील झाला असावा’. असे देखील उर्वशी म्हणाली.

महत्वाच्या बातम्या –

भारतात ड्रग्ज कायदेशीर करा; ‘या’ बाॅलीवूड अभिनेत्याने केली धक्कादायक मागणी

वावर एकरभर आणि उत्पन्न लाखांवर; वाचा काय टेक्निक वापरलंय या शेतकऱ्याने

सैराटने अख्ख्या महाराष्ट्रात फेमस केलेला परश्या सद्या काय करतोय? पहा..

सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी; रियाला दिला उघड पाठिंबा देत म्हणाला..

कंगणाने आता घेतला थेट टाटांशी पंगा; लव्ह जिहादच्या मुद्यावर भिडली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.