Share

एकेकाळी ९ वर्षाच्या मुलासोबत ऑनस्क्रीन रोमांस केल्यामुळे आली होती चर्चेत, वाचा तेजस्वी प्रकाशबद्दल..

Tejsvi-Prakash

रविवारी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रियालिटी शो ‘बिग बॉस १५'(Bigg Boss15) चा महाअंतिम सोहळा पार पडला. यावेळी मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश(Tejsvi Prakash) ‘बिग बॉस १५’ या शोची विजेती ठरली आहे.अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला बिग बॉसच्या ट्रॉफीसह ४० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत. यावेळी प्रतीक सहपाल, करण कुंद्रा(Kran Kundra), निशांत भट्ट आणि शमिता शेट्टी हे देखील अंतिम फेरीत होते. पण तेजस्वीने विजेतेपदाची बाजी मारली.(actress tejswi prakash rommance with 9 year old boy news)

तेजस्वी प्रकाश ही हिंदी अभिनेत्री आहे. तिचा जन्म १० जुन १९९२ रोजी झाला आहे. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने ‘संस्कार’ या मालिकेमधून पदार्पण केले. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची स्टार प्लस वाहिनीवरील ‘कर्ण संगिनी’ मालिकेमधील उर्वीची भूमिका फार गाजली होती. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचे वडील गायक आहेत आणि ते दुबईला असतात.

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. लहानपणापासूनच तेजस्वीला अभिनयाची आवड होती. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाचं तिने मनोरंजन क्षेत्रात करियर करायचं ठरवलं होत. त्यामुळे अभियंत्याची नोकरी सोडून ती अभिनयाकडे वळली.

‘बिग बॉस १५’ या शोआधी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ‘किचन चॅम्पियन ५’ आणि ‘फिअर फॅक्टर: खतरो के खिलाडी’ या शोमध्ये देखील सहभागी झाली होती. ‘खतरो के खिलाडी’ या कार्यक्रमात स्टंट करत असताना तेजस्वीच्या डोळ्याला दुखापतही झाली होती. या कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि शिवीन नारंग यांच्या जोडीची चर्चा रंगली होतीं.

यावर शिवीन नारंग माझा चांगला मित्र आहे. आमच्यात काहीही नाही, असं स्पष्टीकरण अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने दिलं होतं. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने ‘सिलसिला’ या मालिकेत देखील काम केले होते. अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने काम केले होते. २०१७ मध्ये ‘पहरेदार पिया’ या मालिकेमुळे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

या मालिकेमध्ये एका लहान मुलाच्या पत्नीची भूमिका तेजस्वीने साकारली होती. मालिकेत दाखवण्यात आलेला तो लहान मुलगा फक्त ९ वर्षांचा होता. ही मालिका बालविवाहाला प्रोत्साहन देत आहे, असा आरोप काही सामाजिक संघटनांनी केला होता. या मालिकेविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या :-
सांगलीतील ‘पुष्पा’: रक्तचंदनाच्या तस्करीचा भंडाफोड, कोटींचा रक्तचंदन जप्त
एकदाच मुलीचा हात धरणे आणि भावना व्यक्त करणे हा गुन्हा नाही; न्यायालयाने दिला हैराण करणारा निकाल
तरुणाने आपल्याच बहिणीशी केला साखरपूडा; प्रीवेडिंगनंतर समोर आलं भयानक सत्य

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now