खुपच रागीट होती तब्बूची बहीण फराह नाज, रागात चंकी पांडेला केली होती मारहाण; वाचा पुर्ण किस्सा

फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री जगभरात प्रसिद्ध आहेत. अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचा एकेकाळी शिक्का चालत होता. पण आत्ता त्या इंडस्ट्रीपासून दुर आहेत.

अशाच एका अभिनेत्रीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. त्या अभिनेत्रीचे नाव आहे फरहान नाझ. ८० आणि ९० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये फरहाच्या नावाचा शिक्का चालत होता. ती तिच्या सुंदरतेमूळे लाखो लोकांच्या मनावर राज्य करत होती. पण वेळेनूसार तिची प्रसिद्धी कमी होत गेली.

८० आणि ९० च्या दशकामध्ये फराह तिच्या सुंदरतेसोबतच रागामूळे देखील खुप जास्त चर्चेत असायची. इंडस्ट्रीतील सर्वात रागीट अभिनेत्रींमध्ये फराहच्या नावाचा समावेश होता. एकदा तर फरहाने रागाच्या भरात चंकी पांडेच्या कानाखाली वाजवली होती. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

फराह नाजने यश चोप्राच्या ‘फांसले’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पहील्या चित्रपटानंतर ती खुप हिट झाली होती. तिच्या सौंदर्याने तर लाखो लोकांची झोप उडवली होती. सौंदर्यासोबतच फराह तिच्या रागामूळे देखील अनेकदा चर्चेत असायची. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांसोबत तिचे भांडण होते.

१९८९ मध्ये फराह नाज ‘वर्दी की कसम’ चित्रपटाची शुटींग करत होती. या चित्रपटात चंकी पांडे देखील काम करत होते. शुटींग वेळी दोघांमध्ये चांगलेच वाद व्हायला सुरुवात झाली. फराहचा राग माहीती असल्यामूळे लोकं तिच्यापासून लांब राहत होते. तर चंकी पांडे त्यांच्या धुंदीत असायचे.

चित्रपटाच्या सेटवर फराह चंकी ‘I am the man’ असे म्हणत फिरायचे. ही गोष्ट फराहला अजिबात आवडत नव्हती. एक दिवशी फराहचा राग अनावर झाला आणि तिने चंकी पांडेच्या कानाखाली वाजवली. तेवढ्यावरच न थांबता तिने अनेकदा चंकी पांडेला मारले. त्यामूळे दोघांमध्ये चांगलेच भांडण झाले होते.

पण सेटवरील लोकं काहीही करु शकले नाहीत. कारण फराहचा स्वभाव सर्वांना माहीती होता. तिला खुप जास्त राग येतो. ती रागाच असताना तिला काही बोलणे खुप मोठी चुक असते. त्यामूळे सेटवरील लोकं शांत बसले. थोड्या वेळाने दोघांची भांडण थांबली. पण त्यानंतर मात्र दोघांनी एकमेकांशी बोलणे बंद केले.

फक्त चंकी पांडेच नाही तर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांशी तिचे वाद होते. यश चोप्राच्या पत्नीसोबत देखील तिचे भांडण झाले होते. माधूरी दिक्षित, अनिल कपूर अशा अनेक कलाकारांसोबत भांडण होते. फराह नाज अभिनेत्री तब्बूची बहीण आहे.

फराह तिच्या रागासोबतच वैयक्तिक आयूष्यामूळे देखील अनेकदा चर्चेच राहिली. फराहने दारा सिंगच्या मुलासोबत लग्न केले. पण २००२ मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर तिने सुमीत सेहगलसोबत लग्न केले. आत्ता फराह फिल्म इंडस्ट्रीपासून दुर आयूष्य जगत आहे.

महत्वाच्या बातम्या –
विनायक माळीचे व्हिडिओ व्हायरल होण्यामागच खर कारण आलं समोर; जाणून घ्या पुर्ण माहिती..
‘खतरों के खिलाडी ११’ ची राखीने केली भविष्यवाणी; सांगितले कोण आहे या सीझनचा विनर?
विवाहित असताना देखील अभिनेत्रींच्या प्रेमात पागल झाले होते ‘हे’ अभिनेते
सनी लिओनी आहे करोडों संपत्तीची मालकीण; जाणून घ्या कुठे कुठे आहेत बंगले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.