मी हे खपवून घेणार नाही; लग्नाच्या पोस्टवर घाण कमेंट करणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीची थेट धमकी

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असते. तसेच तिच्या आयुष्यात काय सुरु आहे. हे पण सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.

कोरोनामुळे अनेक सेलिब्रीटींनी आपल्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या आहे. तर अनेक काही सेलिब्रीटींनी खुप सामान्य पद्धतीने लग्न केले आहे. अशात सोनाली कुलकर्णीनेही सामान्यपणे लग्न उरकून टाकले आहे. तिने आपल्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

लग्नानंतर सोनालीवर तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर काही नेटकऱ्यांनी लग्नाच्या पोस्टवर तिला ट्रोल केले आहे. यावर सोनालीने जोरदार उत्तर ट्रोल करणाऱ्या या लोकांना दिले आहे.

सोनालीने तिच्या वैयक्तिक बाबतीत नाक खुपसणाऱ्या लोकांचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसते आहे. तिच्या ट्विटरवर एकाने कमेंट्स केली ‘मला वाटलं अमेरिकेत लग्न केलं असेल आणि लग्न केल दुबईत म्हणजे मुलं तेथे होतील अशी शक्यता पण नाही.’

या नेटकऱ्याने केलेल्या टीकेवर सोनाली भडकली. तिने लिहिले “तुम्हाला काहीही वाटू शकतं आणि तुम्ही आम्हाला काहीही बोलू शकता…हे आता खपवून घेणार नाही. किमान मी तरी नाही..समाजभान ठेऊन वागणे, समाजाला देणे लागणे, जबाबदार नागरिक म्हणून वावरणे, माणूसकी जपणे.. हे सगळ आम्ही करायचं आणि तुम्ही फक्त बसून अशा फुकट कमेंट्स टाकायच्या”

तसेच दुसऱ्या एका युझरने ‘परदेशात मजा करत आहेत. कोव्हीडसाठी मदत करा’ असं म्हटलं यावर सोनाली उत्तर देतना म्हणाली, “खरचं?? तुम्ही आम्ही केलेली मदत पाहिली नाही म्हणून आम्ही काही केलचं नाही. किंवा करतच नाही, असं होत नाही. मी काय मदत केली आहे ते बोंबलून सांगण मला तरी योग्य वाटत नाही.”

अनेक लोक सोनालीच्या संपत्तीविषयी खोटा प्रचार करतात. एकाला उत्तर देताना ती म्हणते, राजमहल…आम्हीच पाहिला नाहीये अजून काय हे..काहीही सांगता राव …आमचा 2BHK Flat आहे हो, पण आम्ही सुखी, निरोगी आणि समाधानी आहोत, त्यामुळे आमच्यासाठी हाच आमचा महाल असं सोनालीने म्हटलं आहे.

सोनालीने तिच्या ३३ व्या वाढदिवसाच्या दिवशीच लग्न गाठ बांधली आहे. ७ मे रोजी तिने दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.  सोनालीने दुबईच्याच एका मंदीरात ४ लोकांचे साक्षीने लग्न केले आहे. सोनाली आणि कुणाल या दोघांच्याही आई-वडिलांनी दोघांना ऑनलाईन पद्धतीने आशीर्वाद दिला आहे. त्यानंतर तिने लग्नानंतरच्या सुखी संसाराला दुबईत सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
सोनाली कुलकर्णीचे दुबईचे अलिशान घर पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही; पहा व्हिडिओ
प्राजक्ता गायकवाडचे लवकरच ‘लॉकडाऊन लग्न’; पहा तयारीचे व्हिडिओ आणि फोटोज
कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना किती मिळतो पगार? उत्तर प्रदेश आहे तिसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्र….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.