Actress : बॉलिवूडमधील चकचकीत जगाच्या आड लपलेल्या कटू वास्तवाचा पुन्हा एकदा उलगडा झाला आहे. अनेक अभिनेत्रींच्या(Actress) अनुभवांतून वेळोवेळी कास्टिंग काउचचा प्रकार समोर येत असतो, आणि आता या यादीत अभिनेत्री नवीना बोले हिचाही समावेश झाला आहे. नवीना बोलेने बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान याच्यावर थेट कास्टिंग काउचचा आरोप करत, इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे.
एका यूट्यूब मुलाखतीत नविनाने तिच्यासोबत घडलेला अनुभव उघड केला. ती म्हणाली की, “साजिद खानने मला ‘हे बेबी’ सिनेमासाठी ऑडिशनसाठी बोलावलं होतं. मी त्याच्या घरी गेले आणि तिथे त्याने एक अतिशय अश्लील आणि अयोग्य मागणी केली. त्याने मला कपडे काढून इनरवेअरमध्ये बसायला सांगितलं, असं म्हणत की तो पाहू इच्छितो की मी माझ्या शरीरासोबत किती कंफर्टेबल आहे.”
नवीना पुढे म्हणाली की, “तो म्हणाला की जर मी स्टेजवर बिकिनी घालते, तर अशा गोष्टींमध्ये मला अडचण वाटू नये. त्यावेळी मी खूप अस्वस्थ झाले आणि तिथून बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागले.”
तिने हे देखील सांगितले की, त्या प्रसंगानंतर साजिद खानने(SAJID KHAN)तिला अनेकदा कॉल करून विचारणा केली की ती कुठे आहे आणि का परत येत नाही. तिच्या म्हणण्यानुसार, तो कमीत कमी 50 वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता.
नवीना बोले ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘सीआयडी’ आणि ‘इश्कबाज’ यांसारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री आहे. साजिद खानवर यापूर्वीही अशा प्रकारचे आरोप झाले आहेत, आणि नवीना बोलेच्या खुलाशामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील कामाच्या नावाखाली होणाऱ्या शोषणावर प्रकाश पडला आहे.
actress-shocking-revelation-about-famous-directors-dirty-demand