सलमान खानसोबत काम करायला बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने दिला होता नकार

एखाद्या चित्रपटाची शुटिंग पुर्ण करणे ही सोपी गोष्ट नाही. चित्रपट पुर्ण करण्यासाठी निर्मात्यांना खुप जास्त मेहनत करावी लागते. पण तरीही अनेकदा काही चित्रपट अपूर्णच राहतात. नाही तर मग चित्रपट पुर्ण करण्यासाठी अनेक वादांचा सामना करावा लागतो.

अनेक वेळा हे चित्रपटातील कलाकारांना घेऊन असतात. कारण कधी कधी कलाकार चित्रपट साइन करतात. पण पुर्ण करत नाहीत किंवा थोडी शुटिंग पुर्ण केल्यानंतर ते चित्रपट सोडून देतात. अशाच काही कलाकारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

१)करीना कपूर – करीना कपूर खान बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री आहे. तिने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे. पण करीनाने एका सुपरहिट चित्रपटाला नकार दिला होता. ज्यामुळे तिला आज पश्चात होत आहे. हा चित्रपट होता संजय लीला भन्सालीचा ‘रामलीला’.

या चित्रपटाने दिपीकाला बॉलीवूडची क्वीन बनवले होते. पण या चित्रपटाने नकार दिला होता. असे बोलले जाते की, करीनाने हा चित्रपट साइन केला होता. एवढेच नाही तर दहा दिवसांची शुटिंग देखील केली होती. त्यानंतर तिने या चित्रपटाला नकार दिला.

२)रेखा – बॉलीवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाला आजही त्यांच्या सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी ओळखले जाते. त्यांनी एका पेक्षा एक अधिक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु त्यांनी देखील एका हिट चित्रपटाला नकार दिला होता.

रेखाने नकार दिल्यानंतर या चित्रपटात अभिनेत्री तब्बूने ती भुमिका साकारली होती. हा चित्रपट होता ‘फितूर’. या चित्रपटातील ती भुमिका रेखाला काही खास वाटली नव्हती. म्हणून या चित्रपटासाठी रेखाने नकार दिला होता. त्यानंतर ही भुमिका तब्बूकडे गेली.

३)प्रियंका चोप्रा – सलमान खानसोबत काम करणे बॉलीवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे जिने सलमानसोबत काम करायला नकार दिला होता. ही अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियंकाने सलमान खानसोबत भारत चित्रपट साइन केला होता.

पण काही दिवसांनी तिने या चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर या भूमिकेसाठी कतरिना कैफला ऑफर देण्यात आली होती. कतरिनाने या चित्रपटाला होकार दिला. त्यावेळेस या गोष्टीची खुप जास्त चर्चा झाली होती. या गोष्टीवरून सलमान आणि प्रियांका चोप्रामध्ये वाद देखील झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

सिनेमा सुद्धा फिका पडेल इतकी नाट्यमय लव्हस्टोरी आहे स्मिता पाटील व राज बब्बरची

अलका कुबलच्या मुलींचे फोटो पाहून थक्क व्हाल; सौंदर्यात मोठमोठ्या अभिनेत्रींना देतात टक्कर

घटस्फोटाच्या आदल्या रात्री मलायकासोबत ह्या धक्कादायक गोष्टी घडल्या होत्या

त्या दिवशी करण जोहरने मीडियासमोर गोविंदाची जाहीर माफी मागितली होती; असं काय घडलं होतं?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.