Share

शेणाने जमीन सारवताना अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

टेलिव्हिजन क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक कलाकाराला त्याचा भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. या मेहनतीमुळेच त्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळते. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘मन झालं बाजिंद'(Man Zal Bajind) ही मालिका फार लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे.(actress sanika kashikr viral video from man zal bajind serial)

सध्या या मालिकेतील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मालिकेमधील सीन शूट करण्यापूर्वीची कलाकारांची तयारी दाखवण्यात आली आहे. झी मराठी वाहिनीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मालिकेमधील अंतरा आणि गुली मावशी शेणाने घरापुढील अंगण सारवताना दिसत आहेत.

या बिहाइंड द सीन व्हिडिओमध्ये अंतराची भूमिका करणारी अभिनेत्री सानिका काशीकर सीनची तयारी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अंतराची भूमिका करणारी अभिनेत्री सानिका काशीकर शेणाने घरापुढील अंगण सारवत आहे. शेणात हात घालून अंगण सारवायला अंतराला जमत नसल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

घरापुढील अंगण सारवताना अंतराची रिऍक्शन बघण्यासारखी आहे. ह सीन शूट करत असताना अंतरा खूप मजा करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील रायबान आणि कृष्णाची जोडी प्रेक्षकांना फार आवडली आहे.

अभिनेता वैभव चव्हाण याने ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत रायबानची भूमिका केली आहे. तर अभिनेत्री श्वेता खरातने या मालिकेत कृष्णाची भूमिका केली आहे. काही दिवसांपूर्वी ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री झाली होती. दादासाहेब असं या नव्या पात्राचं नाव होतं. पण प्रेक्षकांना दादासाहेब हे पात्र फार आवडलं नाही.

या पात्रावरून अनेकांनी ‘मन झालं बाजिंद’ मालिकेला सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. मालिकेत नवीन ट्विस्ट आणण्यासाठी काहीही दाखवत आहेत, असा आरोप प्रेक्षकांनी केला होता. “दाखवण्यासाठी काहीही नाही म्हणून नव्या पात्राची एन्ट्री करण्यात आलेली आहे. अशा आयडिया जुन्या झाल्या”, अशी कमेंट एका युजरने केली होती.

महत्वाच्या बातम्या :-
“मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटच नाही तर १० पटीने वाढले”, केंद्रीय कृषीमंत्र्यांचा दावा
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेतृत्वच मनसेचा वापर करत आहे”
…तर भारतात श्रीलंकेसारखी परिस्थीती ओढवेल, याचं भानं केंद्राने ठेवावं; रोहीत पवारांचा घणाघात

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now