सलमान खान, माधूरी दिक्षितसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या साहिला चड्डाची आज झाली आहे वाईट अवस्था

१९९४ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘हम आपके है कौन’ सर्वांनाच माहीतीच आहे. काही दिवसांमध्येच या चित्रपटाला रिलीज होऊन २७ वर्ष पुर्ण होतील. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चागंलीच धमाल केली होती. आजही लोकांना हा चित्रपट तेवढाच आवडतो.

चित्रपटात माधूरी दिक्षित, सलमान खान, मोहनीश बेहेल, रिमा लागू, अनूपम खेर, अलोक नाथसोबतच अभिनेत्री साहिला चड्डा देखील होती. साहिलाने चित्रपटात रिटाची भुमिका निभावली होती. चित्रपटात रिटा नेहमीच सलमान खानच्या मागे होती. पण तरीही सलमान मात्र तिला पटला नाही.

साहिलाच्या भुमिकेला प्रेक्षकांनी खुप पसंत केले होते. पण आज मात्र साहिला लाइमलाईटपासून दुर असते. तिने तिच्या फिल्मी करिअरमध्ये ५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढे चित्रपट करुनही तिला अभिनेत्री म्हणून खास यश मिळाले नाही.

साहिलाचा जन्म एका पंजाबी घरात झाला होता. तिची आई राजस्थानची राजकूमारी होती. साहिला छोटी असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामूळे खुप कमी वयात साहिला एकटी पडली होती. लहान वयातच साहिलाने मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती.

काही वर्षांमध्येच ती टॉपची मॉडेल बनली आणि त्यानंतर तिने मिस इंडियाचा ताज जिंकला. साहिलाचे वडील इंडस्ट्रीतील मोठे निर्माते होते. त्यामूळे मिस इंडीया बनल्यानंतर बॉलीवूडमध्ये प्रवेश करणे साहिलासाठी खुप सोपे होते. तिच्या पहील्या चित्रपटाचे नाव ‘शिला होते’.

साहिलाचा पहीलाच चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर तिने ५० वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले. हिंदीसोबतच साहिलाने तमिळ, तेलगू, भोजपूरी आणि कन्नडा चित्रपटांमध्ये काम केले. इंडस्ट्रीमध्ये तिने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले. पण तरीही तिला यश मात्र मिळू शकले नाही.

५० पेक्षा अधिक चित्रपट करुन देखील साहिला ओळख मिळाली नाही. तिला फक्त हम आपके है कोन चित्रपटातील रिटाच्या भुमिकेसाठी ओळखले जाते. साहिलाच्या करिअरमध्ये हा एकमेव असा चित्रपट ज्याने तिला प्रसिद्ध मिळवून दिली होती.

अनेक प्रयत्न केल्यानंतरही साहिलाला यश मिळाले नाही. त्यामूळे तिने लग्नाचा निर्णय घेतला. साहिलाने २००१ मध्ये निमिया बालीसोबत लग्न केले. दोघांनी एक मुलगी देखील झाली. आजच्या घडीला साहिला एका कंपनीची मालकिण आहे आणि ती लाइमलाईटपासून दुर राहून कुटूंबासोबत आयूष्य जगत आहे.

महत्वाच्या बातम्या –
‘हम आपके है कौन’ चित्रपटात सलमान खानच्या मागे पळणारी रिटा आठवते का? आज दिसते ‘अशी’
रोहित शेट्टी बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीवर झाले होते फिदा; पत्नीला सोडण्याची केली होती तयारी
विवाहीत बॉयफ्रेंडसाठी अमिषा पटेल गेली होती आई वडीलांच्या विरोधात; आई वडीलांवर केला होता गुन्हा दाखल
स्टारडमचा माज दाखवणाऱ्या माधूरी दिक्षितवर ‘या’ कलाकाराने केली होती कायदेशीर कारवाई; पाठवली नोटीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.