शेवटच्या दिवसांमध्ये स्वत:च्याच घरासाठी चढावी लागली कोर्टाची पायरी; खुपच वाईट होता अभिनेत्री साधनाचा शेवट

फिल्म इंडस्ट्रीतील कलाकरांचे आयूष्य खुप रंजक वाटते. सामान्य लोकं त्यांच्यासारखे आयूष्य जगण्याचे स्वप्न बघत असतात. कलाकारांकडे कोणत्याही गोष्टीची कमी नसते असे सर्वांना वाटते. पण खऱ्या आयूष्यात सत्य काही तरी वेगळेच असते.

कलाकारांचे आयूष्य जेवढे रंजक वाटते तेवढे नसते. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेवटच्या क्षणी देखील ते कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये असतात. असेच काही अभिनेत्री साधनासोबत झाले होते. अभिनेत्री साधना ६० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

त्यांनी अनेक नवनवीन ट्रेंड आणले होते. बॉलीवूडच्या मोठ्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करुन त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याकाळी साधना हेअर कट खुप प्रसिद्ध झाली होती. असे अनेक ट्रेंड त्यांनी सुरु केले होते.

अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री साधनाचा शेवट खुप वाईट झाला होता. त्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांच्यासोबत कोणीच नव्हते. एवढेच नाही तर ज्यावेळी त्या आजारी पडल्या. तेव्हा त्यांना तब्येतीची काळजी घेण्याऐवजी कोर्टामध्ये जावे लागत होते.

‘लव्ह इन शिमला’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती. त्यासोबतच या चित्रपटामध्ये साधनाने केलेली हेअरस्टाईल देखील खुप प्रसिद्ध झाली होती. त्यासोबत त्यांचे कपडे देखील खुप प्रसिद्ध झाले होते.

त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर १९६६ मध्ये साधनाने दिग्दर्शक आर के नय्यरसोबत लग्न केले. लग्नानंतर साधनाला थायरॉईडच्या आजाराने ग्रासले. त्यामूळे उपचार घेण्यासाठी अनेक वर्ष बाहेर देशात होत्या. ज्यावेळी त्या भारतात परत आल्या तोपर्यंत इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल झाले होते.

बॉलीवूडमध्ये काम मिळणे बंद झाले. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कुटूंबाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. पण १९९५ मध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचे सगळे आयूष्य बदलून गेले. दोघंना मुलं देखील नव्हते. त्यामूळे पतीच्या मृत्यूनंतर साधना एकट्या पडल्या होत्या.

आयूष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या नशीबात एकटेपण आले होते. त्यासोबत त्यांना शेवटच्या क्षणी खुप महत्वाची लढाई लडायची होती. ही लढाई त्यांच्या प्रॉपर्टीची होती. साधना गेल्या २५ वर्षांपासून ज्या घरामध्ये राहत होत्या. त्या घरासाठी त्यांना शेवटी भांडण करावे लागले होते.

साधना ज्या घरात राहत होत्या ते घर एका बिल्डरने अशा भोसले यांना विकले. त्यामूळे साधनाला त्या घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्यांना खुप जास्त त्रास देण्यात येत होता. शेवटी साधनाला कायदेशीररित्या लढाई लडावी लागली.

साधनाने आशा भोसलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आशा भोसलेने देखील साधनावर गुन्हा दाखल केला. अनेक दिवस कोर्टामध्ये ही केस सुरु होती. त्यावेळी त्यांनी बॉलीवूड कलाकारांकडून मदत देखील मागितली होती. पण कोणीही साधनाची मदत केली नाही.

शेवटी कायदेशीर लढता लढता २०१५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ज्यावेळी साधनाच्या मृत्यू झाला. त्या क्षणी त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. बॉलीवूडला एक वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या अभिनेत्रीचा असा शेवट होणे खुप वाईट होते. म्हणून फिल्म इंडस्ट्रीला जादूची दुनिया बोलले जाते.

महत्वाच्या बातम्या –

अभिज्ञा भावेचा रेट्रो लुक ठरला सोशल मिडीयावर चर्चेचा विषय; पहा फोटो

‘आशिका बनाया आपने’ फेम तनूश्री दत्ताचा हॉट अंदाज; इंग्रजी गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ झाला व्हायरल

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

प्रियंका चोप्राने ट्रान्सपरंट ड्रेस घालून उडवली चाहत्यांची झोप; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.