बॉलीवूडमध्ये बापासोबतही रोमान्स करताना मागे नाही हटल्या या प्रसिद्ध अभिनेत्री, एकीने तर..

बॉलीवूडमध्ये काम करायचे असल्यास अभिनेत्रींचे वय जास्त महत्त्वाचे असते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक अभिनेत्र्या आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या अभिनेत्यांसोबत काम करतात. आणि बॉलीवूडमध्ये आपले नाव कमवतात.

यामध्ये १०,२० किंवा ३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अभिनेत्यांसोबत देखील काम करायला तयार होतात. यामुळे त्या चर्चेत येतात. काही अभिनेत्रींना त्यामुळे दिग्गज अभिनेतेच नव्हे तर त्यांच्या मुलांसोबतही काम करण्याची संधी मिळाली.

यामध्ये दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनीने सपना के सौदागर या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राज कपूर यांच्यासोबत रोमान्स केला आहे. त्याचबरोबर हेमा यांनी राज कपूर यांचे सुपुत्र दिवंगत ऋषी कपूरसोबत ही काम केले आहे.

तसेच सौंदर्याने कोट्यावधी लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेली प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे आणि खास स्थान निर्माण केले आहे. माधुरीने विनोद खन्ना आणि त्याचा मुलगा अक्षय खन्ना या दोघांसोबत काम केले आहे.

तसेच डिंपल कपाडिया यांनी अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार असलेल्या राजेश खन्नाशी लग्न केले. त्यांनी खून का कर्ज, बटवारा सारख्या बर्‍याच चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्याबरोबर रोमान्स केला. त्याच वेळी, डिंपलने दिल चाहता है या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नाबरोबर काम केले होते.

तसेच विश्वसुंदरी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनने तिचे सासरे अमिताभ बच्चन आणि त्यांचे पती अभिषेक बच्चन या दोघांसोबत काम केले आहे. बंटी और बबली या चित्रपटातील कजरा रे गाण्यात ऐश्वर्याने एंट्री केली होती.

तसेच सुंदर अभिनेत्री असलेल्या जया प्रदा देखील या यादीमध्ये समावेश आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या बर्‍याच यशस्वी चित्रपटांमध्ये काम करणार्‍या जया प्रदा यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांचा मोठा मुलगा सनी देओल यांच्यासोबतही काम केले आहे.

ताज्या बातम्या

विद्या बालनने बेडरुमधील सिक्रेट सांगून सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का, म्हणाली नवऱ्यासोबत प्रणय करताना मला..

सलाम! पत्नीचे दागिने विकून रिक्षालाच बनवलं अ‍ॅम्बुलन्स; गोरगरीबांना देतोय मोफत सेवा

“ठाकरे सरकारला स्वत:ची चुक कळली; राज ठाकरेंची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.