सध्याच्या आयुष्यात पैसे खुप महत्त्वाचे आहेत. आपल्याकडे पैसे असतील तर आपण काहीही करू शकतो. त्यामुळे सगळेजण पैशांना खुप जास्त महत्व देतात. बॉलीवूडमध्ये काम करणारे कलाकार देखील पैशांना खुप महत्त्व देतात.
बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्न करताना मुलाचा बँक बॅलन्स चेक केला. त्यानंतर लग्नाला होकार दिला. आज आपण अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे पती करोडोंचे मालिक आहेत.
१)विद्या बालन – बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचे नाव या यादीत सर्वात पहिले येते. विद्याने तिच्या दर्जेदार अभिनयाने खुप लवकर बॉलीवूडमध्ये नाव कमवले. तिने तिच्या करिअरमध्ये हे बेबी, परिणीता यांसारखे चित्रपट केले आहेत.
लग्नाच्या वेळी देखील विद्या बालनने खुप जास्त विचार केला होता. त्यानंतर २०१२ मध्ये विद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले. सिद्धार्थ रॉय कपूर खुप मोठा निर्माता आहे. त्याने आजपर्यंत अनेक चित्रपटांची आणि मालिकांची निर्मिती केली आहे. त्यामुळे त्याच्याकडे पैशांची कमी नाही.
२)असीन – बॉलीवूड आणि साऊथ दोन्हीकडे असीन खुप जास्त प्रसिद्ध आहे. साऊथमध्ये काम केल्यानंतर असीनने ‘गजनी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. त्यानंतर काही दिवसांमध्येच असीन बॉलीवूडमध्ये खुप जास्त प्रसिद्ध झाली.
करिअरमध्ये यशस्वी झाल्यानंतर २०१६ मध्ये असीनने राहुल शर्मासोबत लग्न केले. राहूल शर्मा मायक्रोमॅक्स कंपनीचा को फाउंडर आहे. त्यासोबतच त्याचे अनेक हॉटेल्स देखील आहेत. तो करोडोंचा मालक आहे.
३)शिल्पा शेट्टी – शिल्पा शेट्टी ९० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये शिल्पा शेट्टीचे राज्य होते. तिने तिच्या सुंदरनेते अनेकांना वेडे केले होते. शिल्पा शेट्टी बॉलीवूडच्या काही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्यांनी खुप कमी वेळात बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण केली.
करिअरच्या सुरुवातीला शिल्पा शेट्टी अभिनेता अक्षय कुमारला डेट करत होती. पण त्या दोघांचे लवकरच ब्रेकअप झाले. त्यानंतर शिल्पा शेट्टीने उद्योजक राज कुंद्रासोबत लग्न केले. राज कुंद्रा भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत हेमाची भुमिका साकारणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?
८० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री पुनम ढिल्लों अचानक फिल्म इंडस्ट्रीतून गायब का झाल्या ?
अभिनयासोबतच ‘हा’ व्यवसाय करते बिपाशा बासू; वर्षाला कमावते करोडो रुपये
आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात