एका विवाहित पुरुषाच्यामागे झाली होती वेडी, रेखा यांनी दिली कबुली; म्हणाल्या…

मुंबई : इंडियन आयडल १२ चा भाग चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येक वेळी या कार्यक्रमात खास सेलिब्रिटी येत असतात, ज्यामुळे या शो’ची आणखी गंमत वाढते. यावेळी बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा इंडियन आयडॉलच्या सेटवर सेलिब्रेटी जज म्हणून दिसणार आहे.

या शोच्या प्रोमोच्या अनेक क्लिप्स प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामध्ये रेखा स्पर्धकांसोबत मस्ती करताना दिसत आहे. रेखा यांनी देखील मनसोक्त आनंद लुटलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान, आणखी एक क्लिपही समोर आली आहे.

तसेच कार्यक्रम रंगत असताना होस्ट जय भानुशालीने एक प्रश्न विचारला. ‘रेखाजी, नेहू तुम्ही कधी प्रेमात अगदी वेडी झालेली महिला पाहिली आहे. ते सुद्धा लग्न झालेल्या पुरूषाच्या?’ यावर रेखा म्हणाल्या ‘मला विचारा..’.

दरम्यान, सुरूवातीला त्यांचं हे उत्तर जयच्या लक्षात आलं नाही. पण नंतर जय म्हणाला ‘बाण अगदी निशाण्यावर लागला आहे..’ सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच यामध्ये गायक नेहा कक्कर आणि विशाल ददलाणीला देखील हासू आवरलं नसल्याचं दिसत आहे.

याचबरोबर, रेखा यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. रेखा आणि अमिताभ यांची लव्हस्टोरी तर चांगलीच फेमस आहे.  जया बच्चन आणि अमिताभ यांचे लग्न १९७३ मध्ये झाले होते.

त्या दोघांच्या लग्नानंतर काहीच वर्षांत रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या दो अनजाने या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली असे बोलले जात होते.

महत्त्वाच्या बातम्या 

बॉलीवूडवर कोरोनाचा कहर! अनेक कलाकारांनी प्राॅपर्टी विकत मुंबईला दिला निरोप

शरद पवारांचे पीए ते महाराष्ट्राचे गृहमंत्री; दिलीप वळसे पाटलांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

आंबेगावचे सुपुत्र शरद पवारांचे सर्वात विश्वासू दिलीप वळसे पाटील झाले महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.