अक्षय कुमारच्या प्रेमात वेडी झाली होती रेखा; अशा प्रकारे करायची जवळ जाण्याचा प्रयत्न

अक्षय कुमार बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. त्याचे स्टारडम सध्या बॉलीवूडमध्ये सर्वाधिक आहे. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्डस् तोडत आहेत. त्यामूळे त्याला सध्या सर्वात जास्त डिमांड आहे.

बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या अक्षय कुमारला त्याच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याला सहजासहजी हे यश मिळाले नाही. हे यश मिळवण्यासाठी अक्षय कुमारने दिवस रात्र बॉलीवूडमध्ये मेहनत केली आहे.

अक्षय कुमार त्याच्या करिअरच्या सुरुवातीला चित्रपटांपेक्षा जास्त त्याच्या आफेअरमूळे जास्त चर्चेत असायचा. अक्षय कुमार त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये एक दोन नाही तर अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमध्ये होता.

त्याच्या रिलेशनशीपमूळे त्याच्याबद्दल अनेक चर्चा असायच्या. पुजा बत्रा, रविना टंडन, शिल्पा शेट्टी अशा अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे आफेअर होते. पण त्याचे सर्वात जास्त गाजलेले आफेअर अभिनेत्री रेखासोबत होते.

अक्षय कुमार आणि अभिनेत्री रेखामध्ये खुप जास्त वयाचे अंतर आहे. त्यामूळे त्यांचे हे आफेअर विशेष गाजले. असे बोलले जाते की, रेखा अक्षय कुमारच्या प्रेमात पागल झाली होती. पण अक्षय कुमार मात्र रेखावर प्रेम करत नव्हता.

अक्षय कुमार आणि रेखा अगोदरपासूनच एकमेकांना ओळखत होते. पण ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटाच्या शुटिंग वेळी या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रेखा आणि अक्षय कुमार एकमेकांसोबत खुप जास्त टाईम घालवू लागले.

अक्षय कुमार ज्यावेळी रेखाला भेटला. त्यावेळी तो रविना टंडनला डेट करत होता. पण रेखा आणि अक्षयची जवळीक पाहून रविना अक्षय कुमारपासून लांब गेली. त्यासोबतच या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि रेखाने अनेक बोल्ड सीन्स दिले होते.

चित्रपटाच्या शुटिंग वेळी अक्षय कुमार आणि रेखाच्या आफेअरच्या चर्चा खुप जास्त वाढू लागल्या. रेखा अक्षय कुमार पेक्षा वयाने खुप जास्त मोठ्या होत्या. त्यामूळे अक्षय कुमारला या नात्याचा त्रास होऊ लागला.

रेखा मात्र अक्षय कुमारच्या प्रेमात पागल झाल्या होत्या. त्यामूळे रेखा अक्षय कुमारच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होत्या. पण अक्षय कुमारला मात्र हे नाते नको होते. त्यामूळे तो रेखापासून लांब जाऊ लागला होता.

खिलाडियों का खिलाडी चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला. रेखापासून लांब गेल्यानंतर अक्षय कुमारची भेट शिल्पा शेट्टीशी झाली. शेवटी अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबत लग्न केले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.