करिश्मा कपूरच्या अगोदर ‘या’ चार अभिनेत्रींनी ‘दिल तो पागल है’ चित्रपटाला दिला होता नकार

यश चोप्रा फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठे रोमॅटिंक दिग्दर्शक होते. त्यांची जागा आजही कोणी घेऊ शकत नाही. त्यांच्यासारखे दिग्दर्शन दुसरा कोणताही दिग्दर्शक करु शकत नाही. यश चोप्राने त्यांच्या करिअरमध्ये एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले होते.

१९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘दिल तो पागल है’ चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. हा चित्रपट बॉलीवूडमधल्या काही यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने कमाल केली. त्यासोबतच चित्रपटाचे म्यूजिक देखील हिट झाले.

आजही लोकांना चित्रपटाचे म्यूजिक खुप आवडते. चित्रपटात माधूरी दिक्षित, शाहरुख खान आणि करिश्मा कपूर मुख्य भुमिकेत होते. अक्षय कुमारने देखील छोटीशी भुमिका निभावली होती. या सर्व कलाकारांच्या करिअरमध्ये दिल तो पागल है चित्रपटाने चार चांद लावले होते.

सर्व कलाकारांच्या करिअरसाठी हा चित्रपट महत्वाचा ठप्पा ठरला होता. याच चित्रपटासाठी करिश्माला पहीले नॅशनल अवॉर्ड देखील मिळाले होते. तिच्या करिअरसाठी हा खुप महत्वाचा ठप्पा होता. पण ही भुमिका तिला खुप नशीबाने मिळाली होती.

कारण करिश्मा कपूरला चित्रपटाची ऑफर देण्याअगोदर पाच अभिनेत्रींना ऑफर देण्यात आली होती. पण त्या अभिनेत्रींना चित्रपटाला नकार दिल्यामूळे करिश्माला ही भुमिका मिळाली. असेच काही माधूरी दिक्षितसोबतही झाले होते. जाणून घेऊया नक्की काय आहे हा किस्सा.

इंडस्ट्रीमध्ये असे बोलले जाते की, यश चोप्रा त्यांच्या चित्रपटासाठी खुप मेहनत घेत असतात. स्क्रिप्टपासून ते अभिनेत्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते. दिल तो पागल है चित्रपटासाठी देखील ते अशीच मेहनत घेत होते. त्यांना चित्रपटासाठी खास स्टार कास्ट हवी होती.

माधूरीच्या दिक्षितच्या भुमिकेसाठी त्यांची पहीली पसंत श्रीदेवी होती. पण त्यावेळी श्रीदेवीने बोनी कपूरसोबत लग्न केले होते. त्या गरोदर असल्यामूळे त्यांनी चित्रपटाला नकार दिला. श्रीदेवीने नकार दिल्यानंतर हा चित्रपट माधूरी दिक्षितकडे गेला होता. माधूरीने चित्रपटाला होकार दिला.

करिश्मा कपूरसोबतही तसेच काही झाले. करिश्माच्या अगोदर यश चोप्राने पाच अभिनेत्रींना चित्रपटाची ऑफर दिली होती. जसे की, मनीषा कोईराला, रवीना टंडन, जुही चावला, उर्मिला मातोंडकर अशा अभिनेत्रींना चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती.

पण या सर्व अभिनेत्रींनी चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर चित्रपट करिश्माकडे गेला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर करिश्मा कपूर स्टार झाली. अनेक दिवसांपासून ती एका हिट चित्रपटाची वाट बघत होती. दिल तो पागल है चित्रपटाने तिला यशाचा नवीन रस्ता दाखवला.

महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या ‘ऊपर आका नीचे काका’ म्हणीचे रहस्य; काकांच्या नावाने भिक मागायचे भिकारी
अमिताभसोबत सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करणारे गोगा कपूर बॉलीवूडमधून गायब का झाले? वेगळीच माहिती आली समोर
प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा नवरा आहे साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता; पहा फोटो..
वडील सावत्र आईचं नाव काढत नाही; तर दुसरीकडे नातू कौतूक करता करता थांबत नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.