‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झाला होता रश्मीकाचा साखरपुडा; ‘या’ कारणामुळे झाले ब्रेकअप

सध्या एक साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री खुप जास्त चर्चेत आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे रश्मीका मंदाना. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रश्मीका मंदानाला भारताची नॅशनल क्रश म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतच नाही तर भारताच्या बाहेर देखील रश्मीकाचे लाखो दिवाने चाहते आहेत.

रश्मीकाने २०१६ मध्ये अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. आत्तापर्यंत तिने दहा चित्रपटांमध्ये काम केले आहे. या कमी वेळातच रश्मीकाची साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे. खुपच कमी वेळात रश्मीकाला हे यश मिळाले आहे.

रश्मीकाने विजय देवरकोंडासोबत गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खुप जास्त पसंत केले आहे. आज रश्मीका साऊथ टॉप आणि सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे. कमी वेळात मिळालेल्या यशाने रश्मीका देखील खुप आनंदी आहे.

रश्मीकाचा जन्म ५ एप्रिल १९९६ मध्ये कर्नाटकच्या कोंडामध्ये झाला होता. २०१४ मध्ये तिने एका स्पर्धेत सहभाग घेतला. पण तिला यश मिळाले नाही. त्यानंतर परत २०१५ मध्ये तिने एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि त्याची विजेता झाली.

या स्पर्धेचे फोटो वर्तमान पत्रात छापून आले. ते फोटो बघून त्यावेळी कर्नाटकचे प्रसिद्ध दिग्दर्शक रिषभ शेट्टीने तिला चित्रपटाची ऑफर दिली. २०१६ मध्ये ‘किराक पार्टी’ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. रश्मीका रातोरात कर्नाटकची सुपरस्टार झाली होती.

त्यानंतर तिने ‘चलो’ या चित्रपटातून तेलगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यु केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये तिचा ‘गीता गोविंदम’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने तिला साऊथच नाही तर सगळ्या भारतात प्रसिद्ध केले. हा चित्रपट सुपरहिट झाला.

खुप कमी वेळात रश्मीका यशाच्या शिखरावर चढली होती. तिचे जगभरात चाहते निर्माण झाले होते करोडो लोक तिच्या सौदर्यावर फिदा झाले होते. अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रश्मीकाचा साखरपुडा झाला आहे. अभिनय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर एका वर्षाच्या आतच तिने साखरपुडा केला होता.

रश्मीकाने मल्ल्याळम अभिनेता रक्षित शेट्टीसोबत २०१७ मध्ये साखरपुडा केला होता. रक्षित शेट्टी कन्नड चित्रपटांचा सुपरस्टार आहे. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचे नातं जास्त काळ टिकू शकले नाही. २०१८ मध्ये दोघांनी साखरपुडा मोडला. दोघांच्या ब्रेकअपची खुप जास्त चर्चा इंडस्ट्रीमध्ये झाली होती. कारण दोघांच्या जोडीला लोकांनी खुप पसंत केले होते.

रश्मीकाला ज्यावेळी तिच्या आणि रक्षितच्या साखरपुड्याबद्दल विचारले जाते त्यावेळी ती खुप शांततेत उत्तर देते. एका मुलाखतीमध्ये रश्मीका म्हणाली होती की, आम्ही दोघांनी स्वत च्या मर्जीने साखरपुडा तोडण्याचा निर्णय घेतला होता. सध्या मी माझ्या आयूष्यात खुप आनंदी आहे आणि मी माझ्या करिअरवर लक्ष देत आहे.

रक्षित शेट्टी देखील एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता की, ती मोठे स्वप्न बघणारी मुलगी आहे. मला तिचा भुतकाळ माहीती आहे त्यामूळे ती मोठे स्वप्न पुर्ण व्हावीत एवढीच माझी इच्छा आहे. मी माझ्या आयूष्यात खुप आनंदी आहे आणि मी देखील माझ्या करिअरवर लक्ष देत आहे.

दोघांच्या ब्रेकअपने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. पण दोघेही एकमेकांपासून दुर राहून आनंदी आहेत. इंडस्ट्रीमध्ये असे बोलले जाते की, कठिण परिस्थित दोघे एकत्र होते. पण दोघांना यश मिळाल्यानंतर त्यांनी एकमेकांची साथ सोडून दिली.

महत्वाच्या बातम्या –

मोनी रॉयच्या अदांवर फिदा झाले चाहते; लाल ड्रेसमध्ये दिसतं आहे अप्सरा

कपूर घराण्यात सनई चौघडे! श्रद्धा लवकरच अडकणार लग्नबेडीत, मुलाच्या घरून आला होकार

अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, वडील मला दारुचे सेवन करायला सांगतात आणि नंतर…

टेलिव्हिजनवरील संस्कारी सुन निया शर्माने बिकनी घालून प्रेक्षकांना केले वेडे; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.