जुही चावला, माधूरी दिक्षितसोबत ‘या’ अभिनेत्री चित्रपटाच्या शुटींग वेळी होत्या गरोदर

बॉलीवूड अभिनेत्र्या त्यांच्या दमदार अभिनयासाठी आणि ग्लॅमरस लुकसाठी नेहमीच चर्चेत असतात. अभिनेत्रींनी त्यांच्या मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्र्या त्यांच्या कामासाठी खुप मेहनत करत असतात. त्यामूळे इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी त्या गर्भवती असताना देखील शुटींग केली आहे.

पण ही गोष्ट प्रेक्षकांच्या कधीच लक्षात आली नाही. अनेक चित्रपट असे आहेत ज्यांची शुटींग सुरु असताना त्या चित्रपटातील अभिनेत्र्या गर्भवती होत्या. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री ज्या गर्भवती असताना काम करत होत्या.

जया बच्चन – बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चनच्या नावाचा समावेश या यादीत सर्वात पहीले येतो. एव्हरग्रीन शोले चित्रपट सर्वांनाच माहीती आहे. भारतात असा एकही फिल्म प्रेमी नसेल ज्याने शोले चित्रपट पाहीला नसेल. या चित्रपटात जया बच्चनने महत्वाची भुमिका केली होती.

चित्रपटातील त्यांचा अभिनय पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येते. पण खुप कमी लोकांना माहीती असेल की, या चित्रपटाच्या शुटींग वेळी जया बच्चन गरोदर होत्या. तरीही त्यांनी चित्रपटाच्या शुटींगमध्ये अडथळा येऊ दिला नाही. त्यांनी त्यांचे काम पुर्ण केले.

माधूरी दिक्षित – धकधक गर्ल माधूरी दिक्षितचे आजही लाखो चाहते आहेत. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्साही असतात. देवदास चित्रपटाच्या शुटींग वेळी माधूरी दिक्षित गरोदर होत्या. पण तरीही त्यांनी काम बंद केले नाही. त्या काम करत राहिल्या. त्यांनी चित्रपटाची शुटींग पुर्ण केली. एका गाण्यात त्यांनी ३० किलोचा घागरा घालून डान्स केला होता. काम पुर्ण केले आणि मग त्या सुट्टीवर गेल्या.

श्रीदेवी – १९९७ मध्ये रिलीज झालेल्या जुदाई चित्रपटाला कोणीही विसरु शकत नाही. या चित्रपटात श्रीदेवी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. याच चित्रपटाच्या शुटींग वेळी श्रीदेवी गरोदर झाल्या होत्या आणि ही त्यावेळी खुप मोठी गोष्ट बनली होती.

कारण श्रीदेवी गरोदर झाल्या त्यावेळी त्या अविवाहीत होत्या. त्यांचे आणि बोनी कपूरचे लग्न झाले नव्हते. श्रीदेवी गरोदर असल्याचे समजताच बोनी कपूरने त्यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर श्रीदेवीने मुलगी जान्हवीला जन्म दिला.
जुही चावला – ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. त्या देखील झंकार बीट्स चित्रपटाच्या शुटींग वेळी गरोदर झाल्या होत्या. चित्रपटामध्ये त्या गरोदर स्त्रीची भुमिका निभावत होत्या. म्हणून त्यांच्या गरोदरपणामूळे कोणालाही अडचण झाली नाही.

हेमा मालिनी – हेमा मालिनीचा रझिया सुलतान चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील त्यांच्या भुमिकने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या चित्रपटाच्या शुटींग वेळी हेमा मालिनी गरोदर होत्या. त्यांच्या पोटात इशा देओल होती.

महत्वाच्या बातम्या –
विवाहित असताना देखील अभिनेत्रींच्या प्रेमात पागल झाले होते ‘हे’ अभिनेते
..म्हणून इम्रान खान आणि रेखाच्या लग्नाच्या बातम्या सगळीकडे छापून आल्या होत्या
इंजीनियर आहेत बॉलीवूडचे ‘हे’ चमकते सितारे; नाव वाचून धक्का बसेल
चित्रपटांमध्ये रेप सीन केल्यामूळे खलनायकाच्या आई वडीलांनी त्याच्याशी तोडले होते सगळे नाते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.