अभिनेत्री प्रत्युषाच्या मृत्यूनंतर ५ वर्षांनी विकास गुप्ताने केला मोठा खुलासा; म्हणाला, मी तिच्यासोबत..

मुंबई । छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने हिने काही वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूला पाच वर्ष होऊनही तिच्याबद्दल छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विकास गुप्ताने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे विकास कायम चर्चेत असतो. अनेकदा मुलाखतींमध्ये तो टीव्ही सृष्टीतील कलाकारांवर व त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करताना दिसतो. यावेळी त्याने एका मुलाखतीत प्रत्युषाबाब काही खुलासे केले. तो म्हणाला, “मी आयुष्यात केवळ दोन मुलींना डेट केले आहे. पहिल्या मुलीचे नाव त्याने सांगितले नाही.

परंतु दुसरी प्रत्युषा होती. आम्ही बराच काळ एकमेकांना डेट करत होतो. परंतु मी बाईसेक्शुअल असल्यामुळे आमचे ब्रेकअप झाले. असे त्यांनी सांगितले आहे. त्यावेळी सभोवतालच्या लोकांनी तिला माझ्याबाबत भडकवले होते. त्यामुळे आमच्यात काही गैरसमज निर्माण झाले आणि आमचे ब्रेकअप झाले.

त्यानंतर ती दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडली आणि मी देखील शांतपणे तिच्या आयुष्यातून निघून गेलो. त्याच्या या वक्तव्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शिवाय प्रत्युषाचा मृत्यू झाला त्यावेळी त्याने हे का नाही सांगितले? असा सवालही काही प्रेक्षक त्याला करत आहेत, अनेक प्रेक्षक त्याला यावरून ट्रोल करत आहेत.

प्रत्युषा बॅनर्जीने २०१६ साली आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्या प्रकरणी अभिनेता राहुल राज सिंह याला अटक करण्यात होती. त्याने तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आले होते. मृत्यूपूर्वी प्रत्युषा गरोदर होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ताज्या बातम्या

‘सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्री हवी’, करीना कपूर खानला नेटकऱ्यांचा विरोध

सीट मिळवण्यासाठी तरुणाची भन्नाट कल्पना, एकदा व्हिडिओ बघाल तर हसू आवरणार नाही

बाबो! नवरदेव नवरीच्या हाताने मिठाई खाताना करत होता नाटकं; संतापलेल्या नवरीने पहा मग काय केले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.