फक्त पाचशे रुपये घेऊन मुंबईला आली होती ‘ही’ अभिनेत्री आज कमावते करोडो रुपये

बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी कलाकारांना अनेक गोष्टी सोडाव्या लागतात. अनेकदा तर कलाकारांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी आपले शिक्षण सोडावे लागते. अनेक कलाकार अभिनय क्षेत्रात येण्यासाठी त्यांचे शिक्षण सोडतात. असेच काही अभिनेत्री दिशा पाटनीने केले होते.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी दिशाने तिचे शिक्षण अपूर्ण सोडले होते. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. म्हणून दिशाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. पण तिच्या घरच्यांनी पहिले शिक्षण पुर्ण करायला सांगितले. म्हणून तिने इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला.

पण दिशाने तिचे इंजिनिअरिंगचे शिक्षण कधी पुर्ण केलेच नाही. कारण दिशाला अभिनय क्षेत्रात प्रवेश करायचा होता. त्यासाठी २०१३ मध्ये तिला एक संधी मिळाली होती. ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिशाने कॉलेज मधूनच सोडले होते.

या स्पर्धेमध्ये दिशा फर्स्ट रनरअप होती. या कालावधीमध्ये दिशाने अनेक ऑडिशन दिल्या होत्या. ‘हिरोपंती’ चित्रपटासाठी देखील दिशाने ऑडीशन दिले होते. पण त्यात तिला यश मिळाले नाही. याच काळात दिशाने एका साऊथ चित्रपटासाठी ऑडीशन दिले होते.

त्यामुळे दिशाला साऊथ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. दिशा पटानीने ‘लोफर’ या तेलगू चित्रपटातून तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली आहे. या चित्रपटानंतर देखील दिशाने अनेक ठिकाणी ऑडीशन दिल्या.

तेव्हा दिशाला ‘एम.एस.धोनी’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. ‘एम.एस. धोनी’ हा दिशाचा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात तिचा रोल खुप छोटा होता. पण तो तेवढाच प्रभावी देखील होता. या चित्रपटामूळेच दिशा प्रसिद्ध झाली होती.

दिशाने अभिनेत्री बनण्यासाठी कॉलेजचे शिक्षण अपूर्ण ठेवले आहे. तिने कॉलेज सुरु असताना मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. ती फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईला आली होती. आज तिने या क्षेत्रात तिची एक खास ओळख निर्माण केली आहे.

दिशा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्रामवर आकाऊंट ती अनेक हॉट फोटो पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच दिशाचे इन्स्टाग्रामवर ४० मिलियन फॉलोवर्स झाले आहेत. तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमूळे ती नेहमीच चर्चेत असते.

पण बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी दिशा खुप वेगळी दिसत होती. ती आत्ता जेवढी ग्लॅमरस दिसते तेवढी अगोदर दिसत नव्हती. त्यामुळे तिचे जुने फोटो देखील नेहमीच मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी दिशाचा एक जुना ऑडीशनचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्या आगोदर दिशा पार्थ समंथानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पार्थ हा टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध अभिनेता आहे. पण काही कारणांमूळे नंतर त्या दोघांचे नाते तुटले. बॉलीवूडमध्ये आल्यानंतर दिशाचे नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

लाईमलाईटपासून लांब राहून शेती करत आहे राखी गुलझार

सचिन, सौरव, कपिल हे क्रिकेटर सभ्य वाटतात ना? एकेकाळी त्यांच्याही अफेअर्सची तुफान चर्चा होती

७० आणि ८० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा राजू आज असे आयुष्य जगतो

स्वतः च्या वडीलांमूळे पुजा भट्टचे करिअर फ्लॉप झाले होते?

८० च्या दशकातील बालकलाकार बेबी गुड्डू आता अशी दिसतेय की डोळ्यांवर विश्वास बसनार नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.