घटस्फोटानंतरही अभिनेत्री पुजा बेदी आहे तब्बल ‘एवढ्या’ करोडची मालकिण; जाणून घ्या..

बॉलीवूडची बोल्ड आणि ब्यूटीफुल सिंगल मदर आहे पुजा बेदी. सध्या पुजा चित्रपटांपासून दुर असली तरी लाइमलाईटपासून दुर कधीच नसते. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामूळे बातम्यांमध्ये असते. बोल्ड लुक नाही तर ती तिच्या बोलण्यामूळे देखील नेहमीच चर्चेत असते.

पुजा बेदी दोन मुलांची आई आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पुजा बेदीची मुलगी आलाया देखील अभिनेत्री बनली आहे. तिने काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. पुजा बेदी लग्नाच्या दहा वर्षांनंतरच पतीपासून वेगळी झाली होती. त्यानंतर तिने एकटीनेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला आहे.

पुजा बेदी चित्रपटांपासून दुर असली तरी ती करोडोंच्या संपत्तीची मालकिण आहे. तिच्याकडे पैशांची काहीही कमी नाही. पुजाचा गोव्यामध्ये बिजनेस आहे. त्यामूळेच ती मुंबईपेक्षा जास्त गोवामध्ये राहते. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत गोव्यात राहते. पुजा नेहमीच तिच्या घराचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते.

पुजा बेदी सोशल मिडीयावर देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. तिने ती तिच्या घराच्या सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. असे बोलले जाते की, पुजा बेदी २०० करोड पेक्षा अधिक संपत्तीची मालकिण आहे. त्यामूळे तिच्याकडे पैशांची बिलकूल कमी नाही.

पुजा बेदीने अतिशय सुंदर पद्धतीने तिच्या घराला सजवले आहे. घराच्या सजावटीसाठी तिने अनेक पेटींगचा वापर केला आहे. समूद्रकिनाऱ्यावर बनलेल्या या घरात खुप मोठे गार्डन देखील आहे. त्यासोबतच तिच्या घरात अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहे.

पुजा बेदी ५१ वर्षांची झाली आहे. अभिनेता कबीर बेदी आणि डान्सर प्रोतिमा बेदीच्या घरी जन्मलेली पुजा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. तिला कामसूत्र गर्ल म्हणून देखील ओळखले जाते. ३० वर्षांपूर्वी १९९१ मध्ये पुजाने अभिनेता मार्क रॉबिन्सिंगसोबत कामसूत्र कॉंडोमच्या जाहीरातीत काम केले होते.

त्यावेळी पुजाच्या या जाहिरातीने लोकांची झोप उडवली होती. तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. एवढेच नाही तर दुरदर्शनने ती जाहीरात बॅन केली होती. याच वर्षी ‘विषकन्या’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पण तिला खरी ओळख १९९२ मध्ये रिलीज झालेल्या ‘जो जीता वही सिंकदर’ चित्रपटातून मिळाली होती.

या चित्रपटातून पुजाने इंडस्ट्रीमध्ये बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली होती. पण ही बोल्डनेस तिच्या जास्त कामी आली नाही. पुजा इंडस्ट्रीमध्ये जास्त काळ टिकू शकली नाही. पुजा बेदीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चित्रपट केले आहेत.

महत्वाच्या बातम्या –
सैराटफेम आर्चीच्या मनात आहे ‘हा’ बॉलीवूड अभिनेता; म्हणतीय त्याच्यासोबत डेटवर जायचंय
सलमानच्या राधे चित्रपटाने घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी सर्व रेकॉर्ड तोडत कमवले ‘इतके’ कोटी
‘राज’ चित्रपटातील अभिनेता आज करतो ‘हे’ काम; विश्वास बसणार नाही
VIDEO: मराठी अभिनेत्रीने लस घेताना केले नखरे, मग पहा पुढे काय झाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.