‘फॅशन’ चित्रपटातील अभिनेत्रीने १४ वर्ष मोठ्या बॉयफ्रेंडसोबत केले बिकनी फोटोशूट; पहा फोटो

हिंदी आणि मराठी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडसे सध्या फिल्मी दुनियेपासून लांब आहे. पण तरीही ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामूळे चर्चेत असते. तिच्याबद्दल अनेक बातम्या येत असते. खास करुन तिच्या आणि राहूल देवबद्दलच्या. कारण हे दोघे गेले अनेक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत.

मुग्धाचा जन्म एका महाराष्ट्रीयन कुटूंबात झाला होता. कॉलेजच्या दिवसांमध्ये तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. २००४ मध्ये मुग्धा फेमिना मिस इंडीयाची फायनलिस्ट होती. त्यानंतर तिने ब्यूटी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. अनेक स्पर्धा ती जिंकली.

मॉडेलिंग करता करता तिने अभिनयाला देखील सुरुवात केली. तिने अनेक हिंदी अल्बममध्ये काम केले. फॅशन, ऑल द बेस्ट, डेंजरस इश्क, बेजूबान इश्क अशा अनेक चित्रपटांमध्ये मुग्धाने काम केले. पण ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही खास यश मिळाले नाही.

चित्रपटांपेक्षा जास्त मुग्धा तिच्या लव्ह लाईफमूळे जास्त चर्चेत असते. मुग्धा आत्ता घडीला अभिनेता राहूल देवसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. राहूल देव इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक नकारात्मक भुमिका केल्या आहेत.

हिंदीसोबतच राहूलने तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेमध्ये काम केले आहे. त्याच्या नकारात्मक भुमिकांसाठी त्याला सर्वात जास्त ओळखले जाते. राहूलने रिनाशी लग्न केले होते. त्यांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर कॅन्सरने तिचा मृत्यू झाला.

पत्नीच्या मृत्यूनंतर राहूलच्या आयूष्यात मुग्धाने प्रवेश केला. मुग्धा आणि राहूलमध्ये १४ वर्षांचे अंतर आहे. त्यामूळे सुरुवातीला या दोघांच्या नात्याची खुप जास्त चर्चा होत होती. पण काही काळाने दोघांनी या गोष्टीचा विचार करणे सोडून दिले.

मुग्धा राहूलबदद्ल एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती की, एखाद्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण तसा नसतो. आपण प्रेमात पडल्यानंतर त्या व्यक्तिबद्दल गोष्टी समजून घ्यायला सुरुवात करतो. प्रेमात पडल्यानंतर आपण त्या व्यक्तिच्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करतो.

ती पुढे म्हणाली की, माझ्या आई वडीलांमध्ये दहा वर्षांचे अंतर आहे. त्यामूळे १४ वर्षांचे अंतर काही जास्त नाही. नात्यामध्ये आपलेपणा असला की वयाला महत्व नसते. आम्ही दोघे एकत्र खुप आनंदी आहोत. वयाचे अंतर आमचे प्रेम कमी करु शकत नाही.

मुग्धा आणि राहूल मुंबईमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. राहूलच्या मुलासोबत देखील मुग्धाचे खुप चांगले संबंध आहेत. मुग्धाने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रमामध्ये तिने जज म्हणून काम केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

जाणून घ्या ५० व्या वर्षी २५ वर्षांची दिसणाऱ्या मलायकाचे फिटनेस रहस्य; रोज करते ‘ह्या’ गोष्टी

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पागल झाला होता दाऊद इब्राहिम; रातोरात मुंबईतून केले होते गायब

अनिल कपूर श्रीदेवीला भेटल्यानंतर सर्वात पहीले त्यांच्या पाया पडायचे; कारण समजले तर तुम्ही थक्क व्हाल

दिग्दर्शकाच्या ‘त्या’ घाणेरड्या मागणीला कंटाळून मल्लिका शेरावतने सोडली होती फिल्म इंडस्ट्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.