Nupur Alankar : ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश करणे जेवढे सोपे आहे, तेवढेच तिथे टिकून राहणे अवघड आहे. चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवून निवृत्ती घेतली आहे. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे नुपूर अलंकार.
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नुपूर अलंकारने टीव्ही इंडस्ट्रीतून निवृत्तीची घोषणा केली होती. आता ती पूर्णपणे परमेश्वराच्या आराधनेत गुंतली आहे. नुकताच नुपूर अलंकार हिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती मंदिरात नाचताना दिसत आहे.
दररोज कित्येकजण अभिनेता-अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येतात. यातील काहींची स्वप्नं पूर्ण होत असतात तर काहींना रिकाम्या हाताने परतावे लागते. नुपूर अलंकाराने जवळपास २७ वर्षे टीव्ही इंडस्ट्रीत काम केले. त्यांनतर तिने हे क्षेत्र सोडले.
आता नुपूरने अध्यात्म्याचा मार्ग निवडला आहे. नूपूरचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती कृष्ण मंदिरात नाचताना दिसत आहे. मंदिरातील इतर भाविकांसोबत कृष्ण भक्तीत तल्लीन होऊन नुपूर टाळ्यांच्या कडकडाटात नाचत आहे.
https://www.instagram.com/reel/CjFsdMIjVbv/?igshid=NDRkN2NkYzU=
नुपूर अलंकारने तिच्या करिअरच्या काळात शक्तीमान, घर की लक्ष्मी बेटिया, दिया और बाती हम आणि राजाजी यांसारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे. तसेच तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. सोनाली केबल, सावरिया यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
नुपूरचा हा व्हिडीओ पाहून सगळेजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. नूपुरच्या सांगण्यानुसार, ती तिच्या आईच्या मृत्यूनंतर सांसारिक मोहमाया सोडून बाहेर पडली आहे. तिला आता तिचे उरलेले आयुष्य परमेश्वराची आराधना करण्यात घालवायचे आहे.
महत्वाच्या बातम्या
Madhuri dixit : माधुरी दीक्षितने बॉलीवूडचा खरा चेहरा आणला समोर; सांगितला लाजिरवाणा प्रकार
Ramya Krishnan: ..त्यामुळे साऊथ इंडस्ट्री सोडून मी बॉलीवूडमध्ये थांबले नाही, बाहुबलीमधील शिवगामीचा मोठा खुलासा
Salman Khan: आता सलमान बनणार किसी का भाई, किसी का जान, बॉलीवूडमध्ये ३४ वर्षे होताच केली मोठी घोषणा
Bollywood : बॉलीवूडवर शोककळा! सनम बेवफा, सौतनसारखे हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन