अभिनेत्री नोरा फतेहीने पॅलेस्टाईनवरच्या अन्यायाविरोधात उठवला आवाज; चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन

इस्त्रायलमध्ये सध्या अतिशय भीषण युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी येथील दहशतवादी संघटना हमासमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. गाझा या पट्टीमध्ये मोठे रॉकेट हल्ले पण सुरु आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे दिसून येत आहे.

आता या वादावर अनेक नेत्यांसोबत सेलिब्रीटींनी प्रतिक्रिया दिल्या आहे. प्रसिद्ध अभिनेत्रा नोरा फतेहीने पण या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने पॅलेस्टिनवर होणाऱ्या हल्ल्यांवर विरोधात आवाज उठवली आहे. नोराने याबाबत इन्स्टाग्राम स्टोरी टाकली आहे.

नोराने इस्त्रायलच्या राजकीय आणि सैन्याची अशांतिबद्दल स्टोरीमध्ये पोस्ट केली आहे. तिने त्या अन्यायाविरोधात आवाज उठवला, जो यरुशलमच्या पुर्व भागात होत आहे.

पॅलेस्टिमच्या लोकांवर सतत अत्याचार होत आहे, याबाबत नोराने चिंता व्यक्त केली आहे. कोणाचाही मानवधिकार इतरांपेक्षा जास्त महत्वाचा आहे. हे निवडण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे नोराने म्हटले आहे.

जातीय समानतेचा, एलजीबीटी, महिलांचे हक्क मांडणारे आणि भ्रष्ट व अपमानित राज्यकारभारावर दुखावणारे लोक पॅलेस्टिनच्या दडपशाहीकडे दुर्लक्ष कसे करु शकतात. तुम्ही निवडू नाही शकत का कोणाचे मानवधिकार जास्त महत्वाचे आहे, असेही नोरा फतेहीने म्हटले आहे.

पॅलेस्टिनच्या लोकांना घरातून बाहेर येण्यासाठी इस्त्रायल मजबूर करत आहे. तिने इस्त्रायलचा विरोध केला आहे. तसेच चाहत्यांना इस्त्रायलला विरोध करण्याचे आवाहन देखील केले आहे. विरोधचा अर्थ पॅलेस्टिनच्या लोकांवर होणारा अन्याय थांबवणे एवढाच आहे. पॅलेस्टिनच्या लोकांवर किती अन्याय होतोय, हे सांगण्याचा प्रयत्न तिने केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

जगातली सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर, एकाच चार्जमध्ये धावते २४० किमी; किंमत फक्त..
‘सोनू के टिटू की स्वीटी’ फेम अभिनेत्री आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण; पहा तिच्या मुंबईतील आलिशान घराचे फोटो
तौक्ते चक्रीवादळाचा वानखेडे स्टेडियमला जोरदार तडाखा; स्टेडियमची झाली अशी अवस्था; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.