Share

मुलाच्या आठवनीत व्याकूळ झाल्या निवेदिता सराफ; म्हणाल्या, आईसाठी सर्वात अवघड काय असेल तर…

अभिनेत्री निवेदिता सराफ सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. त्या नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतंच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपल्या मुलासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलेल्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. (actress nividita saraf post photo with son)

अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ परदेशात वास्तव्यास आहे. अनिकेत सराफ परदेशात शेफ म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) यांचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त अनिकेत सराफ भारतात आला होता. वाढदिवस झाल्यानंतर अनिकेत सराफ पुन्हा परदेशात जाण्यासाठी निघाला होता.

यावेळी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ मुलाला सोडण्यासाठी मुंबई विमानतळावर गेले होते. याचा फोटो अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ आणि त्यांचा मुलगा अनिकेत सराफ दिसत आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी लिहिले आहे की, “प्रत्येक पालकांसाठी सर्वात अवघड गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या मुलाला ‘बाय’ म्हणणं.” अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी या फोटोला लाइक केले आहे.

अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ हा परदेशात शेफ म्हणून काम करतो. लहानपणापासून अनिकेतला स्वयंपाकाची आवड असल्याचे अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. या मुलाखतीत अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या की, “अनिकेतला स्वयंपाकाची आवड आहे. त्यामुळेच त्याने शेफ म्हणून काम करायचे ठरवले”, असे निवेदिता सराफ यांनी सांगितले.

अभिनेत्री निवेदिता सराफ मुलाखतीत पुढे म्हणाल्या की, “अनिकेत एक उत्तम शेफ आहे. त्याला पाश्चिमात्य जेवण खूप बनवता येते. माझ्या मुलाने चित्रपट क्षेत्रात काम करण्याऐवजी शेफ म्हणून काम करावे, असे मला वाटतं होते. अनिकेतने माझी इच्छा पूर्ण केली”, असे अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मुलाखतीत सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
‘माझे वडीलच म्हटले बिनधास्त हवे तसे बोल्ड सीन दे’; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खुलाश्याने खळबळ
‘राष्ट्रपती हवाच असेल तर..,’ संजय राऊत स्पष्टच बोलले
आश्रम ३ च्या अभिनेत्रीचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘बोल्ड सीन करण्यापूर्वी वडिलांना…’

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now