बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्री अजय देवगनसोबत काम करायला घाबरतात

अनेक कलाकारांना एकमेकांसोबत काम करायला आवडत नाही. बॉलीवूडमध्ये देखील असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. ज्यांना एकमेकांसोबत काम करायला आवडत नाही. कितीही चांगला चित्रपट असला तरी ते एकमेकांसोबत काम करत नाहीत.

अशीच काही स्टोरी या अजय देवगनची देखील आहे. अजय देवगन बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या सुपेरस्टार्सपैकी एक आहे. त्याची प्रसिद्धी खुप जास्त आहे. त्याचे सगळे चित्रपट सुपरहिट ठरतात.

असे असून देखील अनेक बॉलीवूड अभिनेत्री अजय देवगनसोबत काम करायला घाबरतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी आजपर्यंत कधीही अजय देवगनसोबत काम केले नाही.

१)कतरीना कैफ – बॉलीवूडची बार्बी गर्ल म्हणून ओळख असणाऱ्या कतरीना कैफने आजपर्यंत कधीच अजय देवगनसोबत काम केले नाही. यामागे अनेक कारणे आहेत. पण खरे कारण कोणालाही माहीती नाही. असे बोलले जाते, किती कतरीना अजयला खुप जास्त घाबरते.

म्हणून ती नेहमी त्याला टाळत असते. तिला अजयसोबत काम करण्याच्या अनेक संध्या मिळाल्या होत्या. पण तिने त्या सगळ्या ऑफर नाकारल्या. कतरीनाला अजयसोबत ‘सिंघम’ चित्रपटात घेण्यात आले होते. पण तिने या चित्रपटाला नकार दिला आणि हा चित्रपट काजल अग्रवालने केला.

२)प्रियाका चोप्रा – बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचे नाव देखील या यादीत येते. प्रियांकाने तिच्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये कधीच अजय देवगनसोबत काम केले नाही. तिला अजयसोबत काम करण्याची संधी मिळाली होती.

पण तिने ती संधी स्वीकारली नाही. कारण प्रियंकाला अजय देवगनच्या मस्तीखोर स्वाभावाची भीती वाटते. बॉलीवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत अजय मस्ती करत असतो. ज्यामुळे त्याला अनेक कलाकार घाबरतात.

३)दिपीका पादुकोन – दिपीका पादुकोनने २००७ मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. पण तिच्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये तिने कधीच अजय देवगनसोबत काम केले नाही. तिला अजय देवगनसोबत काम करायचे आहे. पण तिला कधीच तशी संधी मिळाली नाही.

असे बोलले जाते की, अजय देवगन बॉलीवूडच्या सर्वात शांत कलाकारांपैकी एक आहे. शांत असला तरी तो खुप जास्त मस्ती करत असतो. त्यामुळे अनेक कलाकार त्याच्यासोबत काम करायला घाबरतात.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून करिश्मा कपूरची मुलं तिचे चित्रपट पाहत नाहीत

अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या विजय राजकडे सापडले होते ड्रग्स; नऊ दिवस झाली चौकशी

कपूर घराण्यातील सर्वात मोठा नियम तोडून करिश्मा कपूरने बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता

‘या’ कारणांमुळे ‘अंदाज अपना अपना’ फ्लॉप झाला होता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.