अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांची लव्ह स्टोरी

बॉलीवूडमधली धाडसी अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.

दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देखील नीना गुप्ता यांना त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये जास्त यश मिळाले नाही. यामागे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही कारणे जबाबदार आहेत असे म्हटले जाते.

नीना गुप्ता यांनी ‘गांधी’ चित्रपटापासून त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटामध्ये अभिनय केला.

त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. पण ८० च्या दशकामध्ये नीना गुप्ता क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांच्या प्रेमात पडल्या. या दोघांच्या नात्याबद्दल तेव्हा अनेक चर्चा झाल्या.

त्यांना या गोष्टीचा काहीही फरक पडला नाही. ते दोघे प्रेमामध्ये होते. पण १९८८ मध्ये नीना गुप्ता गरोदर राहील्या. नीना गुप्ता व्हिवीयन रिचर्डस बाळाला जन्म देणार होत्या.

पण व्हिवीयनला ही गोष्ट समजल्यानंतर त्याने या बाळाला स्वीकारण्यास नकार दिला. कारण व्हिवीयन आगोदरपासूनच विवाहीत होते.

१९८९ मध्ये व्हिवीयन रिचर्डस परत गेले आणि या दोघांचे नाते संपले. नीनाने १९८९ मध्ये व्हिवीयन रिचर्डसच्या मुलीला जन्म दिला. नीनाने या मुलीचे नाव मसाबा गुप्ता ठेवले.

व्हिवीयन रिचर्डसने या मुलीला त्याचे नाव दिले नाही. त्यामूळे नीनाने या मुलीला नाव दिले. नीना यांनी एकटीने या मुलीचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला.

मसाबाच्या जन्मानंतर नीना आणि व्हिवीयन यांच्यामध्ये मैत्री होती. त्यामूळे नीना अनेक वेळा मसाबाला तिच्या वडीलांना भेटण्यासाठी घेऊन जायच्या. मसाबाने एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे.

अनेक वर्ष नीनाने मसाबाचा एकटीने सांभाळ केला. त्यानंतर १५ जुलै २०१५ ला नीना गुप्ताने विवेक मेहरासोबत लग्न केले. सध्या नीना अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.