नवीन फ्लॅट खरेदी केल्यानंतर काही तासांमध्येच ‘या’ अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता

बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री येतात आणि जातात. पण काही अभिनेत्रींची जागा कोणीही घेऊ शकत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. काही वर्षांमध्येच दिव्या भारतीने बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

दिव्या भारतीने खुप कमी वयात अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी साऊथ चित्रपटांपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. साऊथमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट केले आणि त्यानंतर बॉलीवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

२५ फेब्रूवारी १९७६ ला दिव्या भारतीचा जन्म झाला होता. वयाच्या १९ व्या वर्षी घराच्या बालकणीतून पडून दिव्या भारतीचा मृत्यू झाला. पण एवढ्या कमी वयात देखील दिव्या भारतीने खुप जास्त प्रसिद्धी मिळवली होती.

साऊथमध्ये स्वतः ला सिद्ध केल्यानंतर ‘विश्वात्मा’ चित्रपटापासून दिव्या भारतीने बॉलीवूडमध्ये त्यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचे चित्रपट सुपरहिट झाले होते आणि त्या देखील खुप हिट झाल्या होत्या.

दिव्या भारतीने खुप कमी वेळात बॉलीवूडच्या अनेक मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देण्यास सुरुवात केली होती. असे बोलले जात होते की, दिव्या भारती बॉलीवूडच्या नेक्स्ट सुपरस्टार झाल्या असत्या. पण तसे होऊ शकले नाही. कारण त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू बॉलीवूडसाठी सर्वात मोठा धक्का होता.

जर दिव्या भारती जिवंत असत्या तर त्या आज बॉलीवूडच्या सर्वात हिट अभिनेत्री असत्या. त्यांनी करिअरच्या सुरुवातीला श्रीदेवी, माधुरी दीक्षित अशा अनेक अभिनेत्रींना टक्कर दिली होती. त्यांना बॉलीवूडची दुसरी श्रीदेवी म्हणून ओळखले जाऊ लागले होते.

पण अजून जास्त प्रसिद्धी मिळण्या अगोदरच दिव्या भारती हे जग सोडून गेल्या. वयाच्या १९ व्या वर्षी दिव्या भारती हे जग सोडून गेल्या होत्या. श्रीदेवी आणि अनिल कपूर यांचा ‘लाडला’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

या चित्रपटामध्ये श्रीदेवीच्या अभिनयाचे कौतूक झाले. पण हा चित्रपट सुरुवातीला दिव्या भारतीने साईन केला होता. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण देखील झाले होते. परंतू दिव्या भारतीचा अचानक मृत्यू झाला. त्यामूळे हा चित्रपट श्रीदेवीने केला.

एवढेच नाही तर दिव्याने मृत्यूच्या काही तास अगोदरच मुंबईत नवीन फोर बीएचके फ्लॅट खरेदी केला होता.ही गोष्ट त्यांनी आपल्या भावाला देखील सांगितली होती. काही दिवसांनी त्या आपल्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार होती. पण त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला.

रवीना टंडन आणि अक्षय कुमार, सुनिल शेट्टी यांचा ‘मोहरा’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील गाणे देखील मोठ्या प्रमाणावर हिट झाले होते. ‘तु चीझ बडी है मस्त मस्त’ या गाण्याने तर प्रसिद्धीचे नवीन विक्रम तयार केले होते. या गाण्यात रवीना टंडनचा डान्स कोणीही विसरु शकत नाही.

मोहरा आणि लाडला या चित्रपटांसारखेच दिव्या भारतीने १९९४ मध्ये आलेला ‘विजयपथ’ हा चित्रपट देखील साईन केला होता. पण हा चित्रपट देखील त्या पुर्ण करु शकल्या नाहीत. या चित्रपटामध्येनंतर अभिनेत्री तबूने काम केले.

अनेक स्वप्न आणि अनेक चित्रपट अपूर्ण सोडून दिव्या भारती हे जग सोडून गेल्या. पण तरीही त्यांना आजही कोणी विसरू शकले नाही. शोला और शबनम, दिल का क्या कसूर, दिस आशिया, दिवाना अशा चित्रपटांमधून त्या आजही लोकांच्या मनात आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.