बॉलीवूड अभिनेत्री मयूरी कांगो आज आहे भारतातील गुगल इंडस्ट्रीची हेड; वाचा तिचा थक्क करणारा प्रवास

आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. त्या अभिनेत्री वयाच्या पंधराव्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. या अभिनेत्रीची तुलना ऐश्वर्या रायसोबत केली जात होती. पण फक्त काही वर्षच ही अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये टिकू शकली. आज ती एका मोठ्या इंटरनॅशनल कंपनीची हेड आहे.

या अभिनेत्रीचे नाव आहे मयूरी कांगो. मयूरीचे घर से निकलते ही हे गाणं खुप हिट झाले होते. चला तर मग जाणून घेऊया मयूरी कांगोच्या आयूष्यातील काही रोचक गोष्ट. ९० च्या दशकामध्ये तरुणांच्या मनावर राज्य करणारी मयूरी आज काय करत आहे.

मयूरीचा जन्म औरगांबादमध्ये झाला होता. त्यांची आई नाटकांमध्ये काम करत होती. त्यामूळे त्यांच्यासाठी अभिनय क्षेत्र नवीन नव्हते. त्यांनी आईच्या नाटकांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. एका नाटकासाठी मयूरी आईसोबत मुंबईला आल्या होत्य.

तेव्हा त्यांना बॉलीवूडच्या एका दिग्दर्शकाने पाहीले आणि चित्रपटाची ऑफर दिली. सुरुवातीला मयूरीने चित्रपटाला नकार दिला. पण आईच्या सांगण्यावरुन तिने ‘नसीम’ चित्रपटामध्ये काम केले. मयूरीच्या पहील्याच चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाले होते. या चित्रपटासाठी मयूरीचे खुप कौतूक करण्यात आले.

पहीला चित्रपट पुर्ण झाल्यानंतर मयूरी औरंगाबादला गेली. तिने तिच्या शिक्षणावर लक्ष द्यायला सुरुवात केली. याच कालावधीमध्ये मयूरीला महेश भट्टने चित्रपटाची ऑफर दिली. मयूरीला अभिनय करायचा नव्हता. पण ती महेश भट्टला नकार देऊ शकत नव्हती. म्हणून तिने महेश भट्टच्या ‘पापा केहते है’ चित्रपटाला होकार दिला.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला नाही. चित्रपटातील गाणी मात्र सुपरहिट झाली होती. ‘घर से निकलते ही’ हे गाणं आजही तेवढेच प्रसिद्ध आहे. मयूरीला इंडस्ट्रीमध्ये चांगली ओळख मिळाली. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. त्यानंतर तिने होगी प्यार की जीत, बेताबी, बादल अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

मयूरीने अनेक चित्रपट साइन केले होते. पण त्यातील १६ चित्रपट बनू शकले नाहीत. त्यामूळे तिच्यासाठी हा खुप मोठा धक्का बसला होता. एकेकाळी इंडस्ट्रीमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम करणारी मयूरी आत्ता चित्रपटांमध्ये साईड रोल्स करत होती.

वेळेनूसार मयूरीला चित्रपटाच्या ऑफर येणे बंद झाले. त्यामूळे तिने टेलिव्हिजनवर काम करायला सुरुवात केली. टेलिव्हिजनवर देखील तिला काही खास मिळाले नाही. म्हणून तिने साऊथ चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथे देखील तिला खास यश मिळाले नाही.

बॉलीवूड, साऊथ आणि टेलिव्हिजनवर काम करणारी मयूरी आत्ता लाइमलाईटपासून दुर गेली. अजय देवगनसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला आत्ता चित्रपट मिळणे बंद झाले. शेवटी मयूरीने अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. मयूरीने बिजनेस मॅन आदित्य ढिल्लोसोबत लग्न केले.

लग्नानंतर ती बाहेर देशात स्थायित झाली. लग्नानंतर मयूरीने शिक्षण पुर्ण करण्याचा निर्णय घेतला. तिने शिक्षण पुर्ण केले आणि नोकरी करायला सुरुवात केली. तिने अनेक ठिकाणी काम केले. २०१२ मध्ये मुलाच्या जन्मानंतर मयूरी भारतात परत आली. तिने तिच्या कुटूंबासोबतच करिअर देखील सांभाळले.

मयूरी तिच्या वैयक्तिक आयूष्यामध्ये सुखी होती. दुसरीकडे बॉलीवूड मयूरीला विसरुन गेले होते. पण २०१९ मध्ये मात्र बॉलीवूडमध्ये मयूरीबद्दल खुप जास्त चर्चा झाली होती. पण बॉलीवूडच नाही तर सगळ्या भारतामध्ये मयूरीची चर्चा झाली होती.

कारण २०१९ मध्ये मयूरी गुगल इंडिया इंडस्ट्रीची हेड झाली होती. अनेक वर्ष काम केल्यानंतर तिला हे यश मिळाले होते. तिचे हे यश पाहून इंडस्ट्रीतील सर्वांना तिच्याबद्दल गर्व वाटत होते. आज ती लाइमलाईटपासून दुर असली तरी खुप आनंदी आहे.

गुगल हेड झाल्यानंतर मयूरीने एका मुलाखतीमध्ये तिच्या बॉलीवूडच्या अनूभवाबद्दल सांगितले होते. ती म्हणाली की, बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर दुसरीकडे काम करणे सोपे नाही. तुम्हाला लोकांच्या प्रश्नांसाठी तयार राहावे लागते. पण तुम्ही हार न मानता काम करत राहा. तुम्हाला नक्की यश मिळेल.

महत्वाच्या बातम्या –

साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झाला होता नॅशनल क्रश रश्मीका मंदानाचा साखरपुडा; ‘या’ कारणामूळे झाले ब्रेकअप

मोनी रॉयच्या अदांवर फिदा झाले चाहते; लाल ड्रेसमध्ये दिसतं आहे अप्सरा

अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, वडील मला दारुचे सेवन करायला सांगतात आणि नंतर…

“साहेबराव मला तुझी खुप आठवण येते”, साहेबरावच्या आठवणीत राणादा झाला भावूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.