पतीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री मयूरी देशमुखने पहिल्यांदाच केला अनेक गोष्टींचा खुलासा

झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतील अभिनेत्री मयूरी देशमुखने अनेक दिवसांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मयूरी तिची बेस्टफ्रेंड श्वेताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. काही दिवसांपूर्वी मयूरीचा पती आशुतोष भाकरेने आत्महत्या केली होती.

आशुतोषने उचलेल्या या टोकाच्या पावलामुळे मयूरी आणि तिच्या कुटुंबाला खुप मोठा धक्का बसला होता. आशुतोषच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा मयूरीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिच्या आयुष्यात श्वेताचे किती महत्त्व आहे. हे सांगितले आहे.

माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्वेता. आशूला फार व्यक्त होणे जमत नव्हते. त्यामूळे तुझं आमच्या आयुष्यात असणे किती महत्त्वाचे आहे. हे त्याने तुला कधीच सांगितले नाही. गेल्या वर्षभरात तुझी साथ महत्त्वाची ठरली. तु माझी बेस्ट फ्रेंड असूनही आशूला समजून घेतलंस. नैराश्याच्या आमच्या या प्रवासातील तु महत्त्वाचा घटक होतीस’.

ती पुढे म्हणाली की, ‘ हे अनेक टप्पे कसे पार केले असते काय माहित? दुरून उपदेश न करता मैदानात उतरुन तू आमच्यासोबत हा लढा लढलीस. तु मैत्रीचा अर्थ पुन्हा नव्या दाखवून दिलास. तू अनेकदा आमच्यासाठी नागपूरहून मुंबईला आली आहेस. तुझ्या अशा लहान मोठ्या कृतीतूनच आमचा प्रवास सुसह्य झाला’.

मला माहित आहे, आपल्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. याचे दु:ख आमच्या इतकंच तुलाही आहे. पण मी हा व्हिडिओ करतेय कारण आपल्या भावना व्यक्त करणं महत्त्वाचं आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे खरे हिरो ओळखणं. ती तू आहेस श्वेता.

एखाद्याचा त्रास समजून घेऊन त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची तुझी जी वृत्ती आहे, ही खूप महत्त्वाची आहे. याची मला आणि आशूला खूप मदत झाली. म्हणून आपल्या अपयशामुळे हताश होऊ नको.

जगाला तुझ्यासारख्या माणसांची खूप गरज आहे. त्यामुळे तू आहेस तशीच रहा. लोकांना मदत कर. त्या मदतीचे मोल आम्हाला ठाऊक आहे. मी अशी प्रार्थना करते की, आम्हाली जशी तू मदत केलीस तशी अडचणी असलेल्या प्रत्येकाला मदत मिळो.मला तुझ्यासारखी मैत्रिण लाभली याचा आशूला प्रचंड अभिमान होता.’ असे तिने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

टाटांचा धमाका! भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाडी लाँच करणार टाटा मोटर्स; किंमत आहे..

सुशांत केसची सीबीआयची चौकशी पुर्ण हायकोर्टात अहवाल देणार; जाणून घ्या काय निष्कर्ष निघाला..

भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवणार?

ड्रायव्हींग लायसन्स मिळवा घरबसल्या; अशी करा प्रक्रीया

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.