अबब! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री पाचव्यांदा अडकली लग्नाच्या बेडीत; बॉडीगार्डसोबत बांधली लग्नगाठ

हॉलीवूड स्टार, बिग बॉसची माजी स्पर्धेक आणि हॉट फोटो शुटसाठी प्रसिद्ध असृणारी अभिनेत्री पामेला अँडरसन हिने पाचव्यांदा लग्न केले आहे. पामेला आतापर्यंत ३ वेळा प्रेमात पडली आहे. आता पामेलाने आपल्या बॉडीगार्डसोबतच लग्नगाठ बांधली आहे.

पामेला सोशल मीडियावर कायम ॲक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. पामेलाला ‘बे वॉच’मधील भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली होती. ती ५३ वर्षांची आहे. नाताळच्या मुहूर्तावर पामेलाने तिचा बॉडीगार्ड डॅन हेहर्स्टसोबत लग्न केले आहे. कॅनडातील वॅनकुअरमधील पामेलाच्या राहत्या घरी छोट्या समारंभात पामेलाने लग्न केले.

लॉकडाऊनच्या वेळी पामेला आणि तिचा बॉडिगार्डची प्रेमकथा बहरण्यास सुरुवात झाली. आता त्याच्याबरोबर लग्न केले आहे. तो कॅनडातील एका शहरात बिल्डर म्हणून काम करतो. पामेलाची आतापर्यंतची प्रेम प्रकरणं मिडियासमोर आलेली आहेत.

यावर पामेला म्हणते की, “माझ्या आजी-आजोबांनी २५ वर्षांपूर्वी जी मालमत्ता विकत घेतली होती, तिथे माझं लग्न झालं. माझे आई-वडिलही तिथेच विवाहबंधनात अडकले, आणि ते आजही एकत्र आहेत. आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे.”

बेरोजगारांना मोदी सरकार देतंय महिन्याला ३८०० रुपयांचा भत्ता?; वाचा व्हायरल मेसेजमागील सत्य

फेब्रुवारीत आठ दिवस बँका बंद, कामाचा खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्यांची यादी

सुशीलकुमार शिंदेंनी चुकून फोडलं नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचे नाव; पुन्हा केली सारवासारव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.