काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला होता. या अपघातामध्ये अभिनेत्री मलायका अरोराला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर अभिनेत्री मलायका अरोराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकताच एका मुलाखतीत अभिनेत्री मलायका अरोराने(Malika Arora) या अपघाताचा थरारक अनुभव सांगितला आहे.(actress malika arora talk about accident incident)
अभिनेत्री मलायका अरोरा मुलाखतीत म्हणाली की, “मला आजही ती भयानक रात्र आठवते. माझ्या आजूबाजूला रक्ताचा पडला सडा होता. माझ्या कुटूंबातील सर्वजण घाबरले होते. अपघातानंतर मी फक्त दोन गोष्टींसाठी प्रार्थना करत होते. एक म्हणजे मला त्या रात्री मरायचे नव्हते आणि दुसरी म्हणजे मला माझी दृष्टी गमवायची नव्हती”, असे अभिनेत्री मलायका अरोराने मुलाखतीत सांगितले.
अभिनेत्री मलायका अरोराने मुलाखतीत तिच्या दुखापतीबद्दल देखील सांगितले आहे. अभिनेत्री मलायका अरोरा म्हणाली की, “सुरुवातीला मला दुखापतीबद्दल काहीच माहिती नव्हती. कारण मला धक्का बसला होता. मला काही स्पष्ट दिसत नव्हते. माझ्या आजूबाजूला काचेचे तुकडे विखुरलेले आहेत आणि काही लहान तुकडे माझ्या डोळ्यात गेले आहेत असे मला जाणवत होते.”
“अपघातानंतर तिच्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की ती सतत आईचे आणि मुलगा अरहानचे नाव घेत होती. तसेच फिल्मच्या सेटवर जाण्यासंदर्भात देखील बोलत होती”, असे अभिनेत्री मलायका अरोराने मुलाखतीत सांगितले. या मुलाखतीत अभिनेत्री मलायका अरोराने अभिनेता अर्जुन कपुरसोबत असलेल्या नात्यासंदर्भात देखील खुलासा केला आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा मुलाखतीत पुढे म्हणाली की, “अर्जुनसोबतच्या नात्यात मी खूप आनंदी आणि सकारात्मक आहे. हा आत्मविश्वास मला अर्जुनकडून मिळाला आहे.” यावेळी मुलाखतीत अभिनेत्री मलायका अरोराने अर्जुनचा उल्लेख ‘मॅन ऑफ लाइफ’ असा केला. अपघातानंतर बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या शूटिंगवर परतली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा २ एप्रिल रोजी पुण्याहून मुंबईला येत होती. त्यावेळी मुंबई-पुणे महामार्गावर ट्रॅफिक होतं. यावेळी खालापूर टोलनाक्याजवळ तीन ते चार गाडयांची जोरदार टक्कर झाली. यावेळी एका गाडीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा होती. या अपघातानंतर आसपासच्या लोकांनी अभिनेत्री मलायका अरोरा जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते.
महत्वाच्या बातम्या :-
शिवसेना आता मुघलसेना झालीय, ती आता….;अवघ्या १६ वर्षाच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल
शेअर नाही हे तर राॅकेट! कॉम्प्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला ४००% परतावा
“मी हात जोडून विनंती करत राहीले पण…”, मुस्लीम तरुणीशी लग्न केल्याने हिंदू तरुणाची भर चौकात हत्या