अभिनेत्री मलायका म्हणे, मी पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत रेलशनमध्ये आहे, पण मुलाला..

मुंबई । बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या वेगळ्या अंदाजसाठी नेहेमी चर्चेत असते. ती आणि अभिनेता अर्जुन कपूर अनेकदा एकत्र बघायला मिळतात. सध्या ती प्रियकर अर्जुन कपूरसोबत न्यूयॉर्कमध्ये क्वालिटी टाइम घालवत आहे.

काही दिवसांपूर्वीच मलायका अरोराने प्रियकर अर्जुन कपूरसोबतचे नाते अधिकृतपणे स्वीकारले आहे. तिच्या मुलाबद्दल नेहेमी चर्चा होत होती. अलीकडे मलायका अरोराने एक मुलाखत दिली आहे, ज्यात तिने आपल्या मुलगा अरहानबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

ती म्हणाली, मी अजूनही एक आई आहे, त्यामुळे माझी जबाबदारी बदलली नाही. मी रिलेशनशिपमध्ये आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की मी माझ्या मुलाकडे लक्ष देत नाही, परंतु माझ्या जबाबदाऱ्या बदलल्या नाहीत आणि मी त्या चांगल्या प्रकारे निभावत आहे, म्हणून कोणीही भाष्य करण्याची गरज नाही.

अरबाजपासून विभक्त झाले तेव्हा मी थोडीशी निराश होते, मला माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करायचा होता. पण नंतर मी त्याची आणि स्वतःची काळजी घेतली. असेही मलायकाने म्हटले आहे.

तसेच पुढे ती म्हणाली, माझा मुलगा अरहान मला खूप समजुन घेतो आणि मीही त्याला खूप समजून घेते. आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी माझ्या मुलाने मला खूप साथ दिली आहे. आपल्याला परिस्थितीबद्दल माहिती नसते. मी आणि अरबाज दोघेही आयुष्यात पुढे गेले आहेत.

मलायकाने अरबाजपासून काही वर्षांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तीने अर्जुन कपूरसोबत आपले नाते जोडले आहे. अनेक ठिकाणी ते दोघे एकत्र असतात. यामुळे ते नेहेमी चर्चेत असतात.

ताज्या बातम्या

मिस्टर इंडीया किताब जिंकलेल्या मराठमोळ्या बाॅडीबिल्डरचे ३४ व्या वर्षी कोरोनाने निधन

विद्या बालनने बेडरुमधील सिक्रेट सांगून सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का, म्हणाली नवऱ्यासोबत प्रणय करताना मला..

विद्या बालनने बेडरुमधील सिक्रेट सांगून सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का, म्हणाली नवऱ्यासोबत प्रणय करताना मला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.