शाळेत डान्स करता करता अभिनय क्षेत्रात पोहोचली ‘ही’ अभिनेत्री; एअरपोर्टवर घालावल्या आहेत अनेक रात्री

७० आणि ८० च्या दशकामध्ये अनेक अभिनेत्री होत्या. ज्यांनी आपल्या सुंदरतेने आणि अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. पण काही अभिनेत्री मात्र आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. अशाच एक अभिनेत्री म्हणजे जया प्रदा. आजही अभिनेत्री जया प्रदाचे करोडो चाहते आहेत.

७० आणि ८० च्या दशकामध्ये जया प्रदा बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्री होत्या. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक निर्माते अभिनेते तयार असायचे. हिंदीसोबतच त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. त्या काळच्या सर्व मोठ्या अभिनेत्यांसोबत जया प्रदाने काम केले होते.

अनेक दशके अभिनय क्षेत्रात राज्य करणाऱ्या जया प्रदाने अभिनय क्षेत्रात प्रवेश कला केला. ही एक रोचक कहाणी आहे. त्यांनी स्वत या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांचा अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार नव्हता. पण एका घटनेमूळे त्यांनी अभिनयात येण्याचा निर्णय घेतला.

जया प्रदाचा जन्म ३ ऑगस्ट १९६२ ला आंध्रप्रदेशमध्ये झाला होता. त्यांचे खरे नाव ललिता राणी होते. पण फिल्म इंडस्ट्रीने त्यांना जया प्रदा हे नाव दिले. या नावाने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. पण लहान असताना त्यांनी अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता.

जया प्रदा यांना लहानपणापासूनच डान्सची खुप जास्त आवड होती. म्हणून त्यांनी लहानपणापासूनच डान्स शिकायला सुरुवात केली. शाळेच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी डान्स केला होता. या कार्यक्रमाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक उपस्थित होते. त्यांना जया प्रदाचा डान्स खुप जास्त आवडला.

जयाला त्यांनी एका चित्रपटामध्ये काम दिले. सुरुवातीला जयाने नकार दिला. पण कुटूंबाच्या सांगण्यावरुन त्यांनी या गोष्टीला होकार दिला. त्यांनी चित्रपटामध्ये डान्स केला आणि इथूनच त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली.

१७ व्या वर्षी त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहीले नाही. तेलगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी अशा अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली. एवढ्या कामामूळे त्या खुप व्यस्त होत्या.

शुटींगसाठी त्यांना खुप फिरावे लागायचे. म्हणून त्या अनेक वेळा एअरपोर्टवर अंघोळ करायच्या. विमानामध्ये मेकअप करायचे. असे करुन त्यांनी अनेक चित्रपटांच्या शुटींग पुर्ण केल्या आहेत. अभिनयासोबतच आज जया प्रदा राजकारणात देखील खुप सक्रिय आहेत.

महत्वाच्या बातम्या –

अनिल कपूर श्रीदेवीला भेटल्यानंतर सर्वात पहीले त्यांच्या पाया पडायचे; कारण समजले तर तुम्ही थक्क व्हाल

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनायाने केला बिकनी फोटोशूट; पहा फोटो

विवाहीत असूनही अरुणा इराणीने आई न होण्याचा निर्णय घेतला होता; कारण ऐकून थक्क व्हाल

“पुरंदरचे विमानतळ बारामतीला हलवण्याचा पवारांचा डाव”; शिवसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.