अक्षय खन्नासोबत बॉलीवूडमध्ये लाँच झालेली ‘ही’ अभिनेत्री आज कुठे आहे

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ९० च्या दशकात अनेक सुंदर अभिनेत्र्या काम करत होत्या. त्यामुळे हे दशक इंडस्ट्रीसाठी खुप महत्त्वाचे आहे. त्याकाळी अनेक सुंदर अभिनेत्रींनी बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. त्यांच्या सुंदरतेचे खुप जास्त कौतुक करण्यात आले होते.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे अंजला जावेरी. दिसायला अतिशय सुंदर असणारी अंजला बॉलीवूडमध्ये आल्यानंतर खुप कमी वेळातच खुप जास्त प्रसिद्ध झाली होती. आज ती फिल्म इंडस्ट्रीपासून खुप लांब आहे.

पण अंजलाचे चित्रपट पहिल्यांनंतर अनेकांना हा प्रश्न पडतो की अंजला जावरी आज कुठे आहे आणि कसे आयुष्य जगत आहे? एका हिट चित्रपटानंतर ती बॉलीवूडमधून गायब झाली होती. जाणून घेऊया आज अंजला जावेरी सध्या काय करत आहे.

असे बोलले जाते की, अंजला विनोद खन्नामूळे बॉलीवूडमध्ये आली होती. विनोद खन्ना त्यावेळी त्यांच्या मुलाला बॉलीवूडमध्ये लाँच करण्याची तयारी करत होते. त्यामुळे त्यांना एका नव्या चेहऱ्याची शोध होती. त्यांनी नवीन अभिनेत्रीसाठी शोध सुरू केला.

त्यांनी अनेक ठिकाणी स्पर्धांचे नियोजन केले. त्यात अनेक मुलींनी सहभाग घेतला होता. याच स्पर्धेत अंजला जावेरीने देखील सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अंजलाचा परफॉर्मन्स सर्वांना आवडला होता. ती या स्पर्धेची विजेता ठरली.

विनोद खन्नाने ‘हिमालया पुत्र’ चित्रपटातून अंजलाला बॉलीवूडमध्ये लाँच केले होते. या चित्रपटात अंजलासोबत अक्षय खन्ना मुख्य भुमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. पण अंजला मात्र फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिट झाली होती.

तिच्या सुंदरतेवर अनेकजण घायाळ झाले होते. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण तरीही तिला बॉलीवूडमध्ये काही खास ओळख निर्माण झाली नाही. म्हणून तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

अंजलाने तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. तिला साऊथमध्ये खुप जास्त प्रसिद्धी मिळाली. ती साऊथमध्ये टॉपची अभिनेत्री झाली. तिला दिवसेंदिवस अभिनयात चांगले यश मिळत होते.

अंजलाने हिंदीमध्ये बेताबी, सोच, मुस्कान, बाझार अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचा सर्वात जास्त गाजलेला एकमेव चित्रपट म्हणजे सलमान खान आणि काजोलसोबत केलेला ‘प्यार किया तो डरना क्या’ हा होता.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खुप हिट झाला होता. ह्या चित्रपटाने अंजलाला खुप जास्त प्रसिद्ध मिळवली होती. पण हे यश अंजलाला सांभाळता आले नाही. त्यामुळे ती खुप कमी वेळात बॉलीवूडमधून गायब झाली होती. २०१२ मध्ये रिलीज झालेला ‘लाईफ इस ब्युटीफुल’ हा अंजलाच शेवटचा चित्रपट होता.

त्यानंतर अंजलाने तरुण अरोरासोबत लग्न केले. लग्नानंतर ती अभिनय क्षेत्रापासून खुप लांब गेली. ती सध्या अभिनयापासून लांब आपल्या पतीसोबत सुखाने संसार करत आहे. तिला संधी मिळाली तर ती परत एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

सलमान खान आणि रवीना टंडन यांच्यात झाले भांडण; कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का

मराठी फिल्म इंडस्ट्रीतले हास्य सम्राट अशोक सराफ यांना मामा कोणी बनवले ?

बॅक स्टेजला लाईटचे काम करणारा ‘हा’ अभिनेता आज आहे टेलिव्हिजनवरील स्टार

सुरैयाच्या प्रेमात पागल झाले होते देवानंद; पण ‘या’ गोष्टीमूळे लग्न होऊ शकले नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.