हिंदी चित्रपटसृष्टीत(Bollywood) जेव्हा जेव्हा स्त्रीच्या नकारात्मक भूमिकांचा उल्लेख येतो तेव्हा एकच चेहरा डोळ्यासमोर येतो. तो चेहरा म्हणजे अभिनेत्री ललिता पवार. अभिनेत्री ललिता पवार यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची पसंती मिळवली होती. अभिनेत्री ललिता पवार यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांनी लोकांच्या मनात भीती निर्माण केली होती.(actress lalita pawar famous story)
त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सासू आणि आईच्या भूमिका साकारल्या होत्या. करिअरच्या सुरुवातीच्या काळात ललिता पवार यांच्यासोबत एका किस्सा घडला होता. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात झाल्यामुळे त्यांना डोळे गमवावे लागले होते. यादरम्यान अभिनेत्री ललिता पवार यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले होते.
ही गोष्ट १९४२ सालची आहे. अभिनेत्री ललिता पवार ‘जंग-ए-आझादी'(Jung Ye Azadi) चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. या चित्रपटातील एका सीनमध्ये अभिनेता भगवान यांना ललिता पवार यांना कानाखाली मारायची होती. अभिनेता भगवान यांनी अभिनेत्री ललिता पवार यांना इतक्या जोरात कानाखाली मारली की त्या खाली पडल्या.
अभिनेत्री ललिता पवार यांच्या कानातून रक्त वाहू लागलं. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिनेत्री ललिता पवार कोमात गेल्या होत्या. त्या दीड दिवस कोमात होत्या. त्यानंतर अभिनेत्री ललिता पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. पण या अपघातात त्यांच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली होती.
अभिनेत्री ललिता पवार यांच्या शरीराच्या उजव्या बाजूला अर्धांगवायू झाला होता. कालांतराने अर्धांगवायू हळूहळू बरा झाला. पण अभिनेत्री ललिता पवारयांचा उजवा डोळा कायमचा निकामी झाला होता. त्यांचा उजवा डोळा पूर्णपणे आकसला होता. या गोष्टीचे अभिनेते भगवान यांना कायम शल्य वाटत राहिलं. यानंतर अभिनेत्री ललिता पवार बराच काळ मनोरंजन क्षेत्रापासून दूर राहिल्या.
१९४८ साली अभिनेत्री ललिता पवार पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतल्या होत्या. ललिता पवार यांनी वयाच्या ९ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. एकदा ललिता पवार त्यांच्या वडिलांसोबत चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक नाना साहेबांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी ललिता पवार यांना ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटात बालकलाकारची भूमिका ऑफर केली.
महत्वाच्या बातम्या :-
‘दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या मंत्र्याला भर चौकात.., आमदार महेश लांडगेंचे वादग्रस्त वक्तव्य
क्रुर पत्नी! सुट्टीवर आलेल्या सैनिक पतीची प्रियकरासोबत मिळून केली हत्या, पोलिसांनी असा लावला छडा
आपल्या आख्ख्या पिढीची कमाई नाही एवढी किंमत आहे अंबानींच्या सुनेच्या लेहंगा आणि ज्वेलरीची; असा होता सुनेचा विवाहातील ‘रॉयल लूक’