Khushi Mukherjee : बॉलिवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी खुशी मुखर्जी (Khushi Mukherjee) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचा एका कॅफेबाहेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरवेळीप्रमाणेच, याहीवेळी तिच्या वादग्रस्त कपड्यांमुळे ही चर्चा रंगली आहे.
व्हिडीओमध्ये खुशीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, जो दोन्ही बाजूंनी संपूर्णपणे ओपन होता. ती जेव्हा आपल्या कारमधून खाली उतरते, त्याच वेळी जोराचा वारा आल्यामुळे तिचा ड्रेस उडू लागतो. त्यानंतर खुशीला आपले प्रायव्हेट पार्ट्स हाताने झाकावे लागतात. या सगळ्या प्रकाराचे चित्रीकरण तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सनी केलं.
ड्रेसमुळे गैरसोयीची स्थिती निर्माण झाल्यानंतर खुशीने फोटोग्राफर्सकडे नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, “थांबा क्लिक करू नका. क्लिक तुम्ही करता आणि बदनामी मात्र माझी होते.” पण ही तिची प्रतिक्रिया अनेक युजर्सना पचली नाही. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला जबरदस्त ट्रोल केले. एक युजर म्हणाला, “जेव्हा दाखवण्यासाठीच कपडे घालतो, तेव्हा लपवायचं कशासाठी?” तर दुसऱ्याने लिहिलं, “असे कपडे घालून मग इतरांना दोष देणं हास्यास्पद आहे.”
या सगळ्यावर अभिनेत्री फलक नाझ (Falak Naaz) हिने आपली प्रतिक्रिया देताना खुशीवर खरपूस टीका केली आहे. फलकने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत व्हिडीओ शेअर केला. फलक म्हणाली, “जर कोणी रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालत असेल तर प्रचंड गोंधळ होतो. मग सरकार अशा लोकांवर कारवाई का करत नाही? ही मीडिया आणि अशा लोकांवर दंड लावला पाहिजे. आपण समाजात राहतो. तिथे असे कपडे घालून फिरणे योग्य आहे का? मला याचे उत्तर हवे आहे.”
फलक आणि खुशी यांच्यातील वाद काही नवीन नाही. याआधीही खुशी मुखर्जी (Khushi Mukherjee) हिने फलकला ‘बेरोजगार’ असे म्हटले होते, त्यावर प्रत्युत्तर देताना फलक म्हणाली होती, “किमान आम्ही रस्त्यावर अर्धनग्न होऊन फिरत नाही.”
Why do they wear even this much 🫢 pic.twitter.com/tebmyIk6ce
— Deepika Narayan Bhardwaj (@DeepikaBhardwaj) June 28, 2025
खुशीच्या वादग्रस्त फॅशन स्टाईलमुळे सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी अशा प्रकारच्या कपड्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे मत व्यक्त केले आहे. दुसरीकडे काहींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करत खुशीचं समर्थनही केलं आहे.