राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल अभिनेत्री केतकी चितळे हीने शरद पवार यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्री केतकी चितळे हीने अत्यंत हीन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.(actress ketki chitale take electric shock)
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत अभिनेत्री केतकी चितळेला अटक केली आहे. यापूर्वी देखील अभिनेत्री केतकी चितळे अनेकवेळा वादात सापडली होती. तिला अनेकवेळा सोशल मीडियावर ट्रोलही केलं गेलं होतं. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता.
केतकीने तिच्या इन्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. यामध्ये ती इलेक्ट्रिक शॉक घेताना दिसत होती. तिचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून सगळ्यांना धक्का बसला होता. काही वर्षापासून केतकीला एपिलेप्सी म्हणजे अपस्मार हा आजार आहे. या आजारावर केतकी वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे.
या आजारावर ट्रिटमेंट घेतानाचे फोटो व व्हिडीओ तिने काही दिवसांपूर्वी इन्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. या पोस्टला तिने ‘एपिलेप्सी वॉरिअर क्विन’ असे कॅप्शन दिले होते. इलेक्ट्रीक शॉक घेण्यापूर्वीची आणि इलेक्ट्रीक शॉक घेतल्यानंतरची सर्व परिस्थिती तिने या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली होती. या व्हिडीओमध्ये केतकीने हॉस्पिटलचा ड्रेस घातला होता.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. अभिनेत्री केतकी चितळेने टेलिव्हिजनवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ तसेच ‘आंबट गोड’ या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये देखील तिने काम केलं आहे. काल अभिनेत्री केतकी चितळे हीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती.
तिने फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे,समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ? तू तर मच्छर भरला तुझा पापघडा, गप! नाही तर होईल राडा खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड.”
महत्वाच्या बातम्या :-
दिनेश कार्तिकची पत्नी प्रेग्नेंट झाली पण मुल निघालं मुरली विजयचं, किस्सा वाचून अवाक व्हाल
प्रश्नांची उत्तर कशी द्यायची हे महेशबाबूने शाहरूखकडून शिकावे, ‘तो’ जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
मुंबई-चेन्नईच्या मॅचदरम्यान दिसली मिस्ट्री गर्ल, तिची स्माईल पाहून चाहते फिदा, कोण आहे ती?