सध्या अभिनेत्री केतकी चितळे खूप चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल अभिनेत्री केतकी चितळे हीने शरद पवार यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्री केतकी चितळे(Ketaki Chitale) हीने अत्यंत हीन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.(actress ketaki chitale allegatons on marathi serial director)
यापूर्वी देखील अभिनेत्री केतकी चितळे अनेकवेळा वादात सापडली होती. ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेतून अभिनेत्री केतकी चितळेला काढून टाकण्यात आले होते. यानंतर अभिनेत्री केतकी चितळेने मालिकेच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले होते. Epilepsy या आजारामुळे मला ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ मालिकेतून काढून टाकण्यात आलं, असा आरोप अभिनेत्री केतकी चितळेने केला होता.
‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेच्या निर्मात्यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. अभिनेत्री केतकी चितळे मालिकेत नीट काम करत नाही. त्यामूळे तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले, असे स्पष्टीकरण मालिकेच्या निर्मात्यांनी दिले होते. यावेळी अभिनेत्री केतकी चितळेने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेच्या दिग्दर्शकावर देखील आरोप केले होते.
अभिनेत्री केतकी चितळेचा जन्म ३० डिसेंबर १९९२ झाला आहे. केतकीला लहानपणापासूनच डान्स आणि मालिकांची आवड आहे. तिने २०१० मध्ये तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. केतकीने ‘सास बिना ससूराल’ या हिंदी मालिकेमधून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. या मालिकेमध्ये केतकीची भुमिका खुप छोटी होती. पण त्यानंतर तिने मराठी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
२०१२ मध्ये केतकी चितळेने स्टार प्रवाहवरील ‘आंबट गोड’ या मालिकेपासून मराठीतील प्रवास सुरु केला. या मालिकेतील तिची आबोलीच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. त्यानंतर तिने ‘तुझं माझं ब्रेक अप’ या मराठी मालिकेमध्ये काम केले. या मालिकेतील मीराच्या भुमिकेने तिला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवून दिली.
याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये देखील तिने काम केलं आहे. तिने ‘भो भो’ या मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात ठाणे पोलिसांनी अभिनेत्री केतकी चितळेवर कारवाई केली आहे. या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘या’ आजारामुळे मालिकेतून काढून टाकल्याचा गंभीर आरोप केतकी चितळेने दिग्दर्शकावर केला होता
केतकी चितळे प्रकरणावर ब्राम्हण महासंघाने दिली धक्कादायक प्रतिक्रिया; म्हणाले, केतकीने जे केले ते…
कथा ठाण्याच्या ढाण्या वाघाची! जाणून घ्या कसा आहे धर्मवीर चित्रपटाचा रिव्ह्यू