मनोरंजनसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. तमिळ आणि तेलुगू सिनेसृष्टीतील अभिनेत्री काव्या थापर (Actress Kavya Thapar Arrested) हिला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. नशेत कार चालवत एका व्यक्तीला धडक दिल्याचा तिच्यावर आरोप आहे. तसेच जेव्हा पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने पोलिसांसोबत असभ्य भाषेचा प्रयोग केल्याचाही तिच्यावर आरोप आहे.
एएनआयने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. यामध्ये सांगण्यात आले की, अभिनेत्री काव्या थापरला जूहू पोलिसांद्वारे अटक करण्यात आली आहे. दारूच्या नशेत कार चालवत एका व्यक्तीला जखमी करणे आणि पोलिसांशी असभ्य भाषेत बोलत वाद घालण्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. सध्या काव्याची न्यायायलीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Maharashtra | Actress Kavya Thapar was arrested & sent to judicial custody, on charges of engaging in a scuffle & using abusive language with the police, after she hit a car & injured a person under the influence of alcohol, yesterday morning: Juhu Police
— ANI (@ANI) February 18, 2022
काव्याचा जन्म २० ऑगस्ट १९९५ रोजी महाराष्ट्रात झाला. तिने बॉम्बे स्कॉटिश स्कूल, पवई येथून तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अॅन्ड कॉमर्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
मनोरंजन जगतात सुरुवातीला काव्या ‘तत्काल’ नावाच्या एका हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. तेलुगूमधील ‘ई माया पेरेमिटो’ (Ee Maaya Peremito) हा तिचा पहिला चित्रपट होता. २०१८ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने ‘मार्केट राजा एमबीबीएस’ (Market Raja MBBS) या तमिळ चित्रपटात काम केले. नुकतीच ती ‘एक मिनी कथा’ (Ek Mini Katha) या तेलुगू चित्रपटात दिसली होती.
चित्रपटांशिवाय काव्या काही म्यूझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे. यामध्ये ‘रहने लगे तुम दिल में’ (Rehne Lage Tum Dil Mein), ‘लेजा लेजा रे माही’ (Leja Leja Re Mahi), ‘मेहंदी लगी’ (Mehendi Lagi) यासारख्या म्युझिक व्हिडिओंचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
१२ व्या मजल्यावर बाल्कनीला लटकून करत होता व्यायाम, व्हिडीओ पाहून काळजाचा ठोका चुकेल
साजिद नाडियावाला आणि दिव्या भारतीच्या लव्हस्टोरीमध्ये गोविंदाचा होता महत्वाचा रोल, वाचा किस्सा
सुकेशसोबतचे खासगी फोटो लीक झाल्यानंतर जॅकलीन पहिल्यांदाच दिसली इतकी आनंदी, पहा व्हिडीओ