मराठमोळी अभिनेत्री कविता मेढेकर यांनी शेअर केला मुलीसोबतचा फोटो, फोटो बघून घायाळ व्हाल..

मुंबई । अनेक मराठी अभिनेत्री आपल्याला माहित असतात, मात्र त्यांच्या कुटूंबातील सदस्य किंवा त्यांची मुलं आपल्याला माहीत नसतात. अभिनेत्री कविता मेढेकर या एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. अनेक मालिका, चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

या क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कविता लाड यांनी पेपरमधली जाहिरात वाचून पैलतीर या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. बालकलाकार म्हणून या मालिकेत झळकण्याची त्यांना नामी संधी मिळाली होती. यामुळे त्या या क्षेत्रात आल्या. आणि त्यांनी पुढे अनेक ठिकाणी कामे केली.

तसेच ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये असताना डॉ गिरीश ओक एक एकांकिका बसवत होते. कविता लाड यांना अभिनयाचा कुठलाही अनुभव नसताना डॉ. गिरीश ओक यांनी अगोदर एकांकिका वाचायला सांगितली. आणि कविता लाड यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला.

तसेच चार दिवस सासूचे, उंच माझा झोका, राधा ही बावरी, राधा प्रेम रंगी रंगली, एका लग्नाची गोष्ट, लपून छपून, उर्फी, एका लग्नाची पुढची गोष्ट या आणि अशा अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांतून त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. यामुळे त्या चर्चेत आल्या, प्रसिद्ध झाल्या.

कविता लाड यांनी आशिष मेढेकर यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुलं आहेत. नुकतेच त्यांनी गौरी गणपतीचे औचित्य साधून आपली लेक सनाया सोबतचा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केला. हा फोटो बघून चाहते अवाक झाले आहेत. हा फोटो खुपच सुंदर आहे.

या फोटोला ‘माझी गौरी’ असे कॅप्शन देऊन त्यांनी हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोवरून कविता मेढेकर आणि त्यांची लेक सनाया यांचे सेलिब्रिटींकडून कौतुक होत आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.