“लोकसंख्या वाढत असल्यामुळे लोक मरताय, तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात टाका”

बॉलिवूड क्वीन कंगना राणावत नेहमीच आपल्या परखड मतामुळे चर्चेत असते. तिच्या काही वक्तव्यांमुळे ती नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत असते. तसेच अनेक वेळा तिच्या वक्तव्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोलही होत असते.

आता कंगना राणावत पुन्हा एकदा एका ट्विटमुळे चर्चेत आली आहे. भारतातील वाढत्या लोकसंख्येवर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्याच अडकण्याची शक्यता आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे देशात लोक मरत आहे, असे कंगनाने म्हटले आहे. देशात लोकसंख्या सतत वाढत चालली असल्याने लोक मरत आहे. त्यामुळे तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना दंड ठोठवावा आणि त्यांना तुरुंगवासाची शिक्षा द्यावी, असे ट्विट कंगनाने केले आहे.

तसेच कंगनाने इंदिरा गांधींच्या हत्येबद्दलही ट्विटमध्ये लिहिले आहे. हे खरे आहे, की इंदिरा गांधी निवडणूक हरली आणि त्यानंतर त्यांनाही मारण्यात आले, कारण त्यांना या विषयावर कारवाई करायची होती, असेही ट्विट कंगनाने केले आहे.

कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून सगळीकडे कंगनाच्या ट्विटचीच चर्चा सुरु आहे. अशात तिच्या ट्विटला काही लोकांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय, तर काही लोकांनी या ट्विटमुळे तिला ट्रोल केले आहे.

दरम्यान, कंगनाचा आता थलायवी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री सी. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. हा चित्रपट २३ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात आणीबाणी जाहीर करा; चक्क काँग्रेसनेच केली पंतप्रधानांकडे मागणी
एकाच वेळी ५०० लोकांचा गेला असता जीव; पण अखेरच्या क्षणात घडला ‘तो’ चमत्कार
कॉमेडीयन सुनील ग्रोवरची पत्नी दिसते अभिनेत्रीपेक्षाही सुंदर; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.