मोठी बातमी! अभिनेत्री कंगना रणावतच्या बॉडीगार्डविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई । अभिनेत्री कंगना राणावत गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत असते. ती नेहमी वेगवेगळी वक्तव्य करत असते. कधी राजकीय नेत्यांना तर कधी बॉलिवूड कलाकारांना ती नेहेमी काही ना काही बोलत असते. यामुळे ती अनेकदा वादात देखील सापडली आहे.

ट्विटरवर देखील वेगवेगळे ट्विट ती करत असते. यामुळे तिचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले आहे. आता मात्र ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिच्या खाजगी बॉडीगार्डवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुमार गोडसे असे या बॉडीगार्डचे नाव आहे. आता या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. ज्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो अभिनेत्री कंगना रणावतचा बॉडीगार्ड असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर एका ब्युटीशीयन महिलेने बलात्कार, अनैतिक संबंध, फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामुळे आता पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत हा व्यक्ती अभिनेत्री कंगना रणावतचा बॉडीगार्ड असल्याचे समोर आल्याने सर्वांना एकच धक्का बसला. कंगना रणावत सध्या मुंबईत नसून ती तिच्या घरी मनालीला गेली आहे.

काही दिवसांपूर्वी तिला कोरोनाची लागण झाली होती. तिने घरीच उपचार घेतल्यानंतर तिची तब्येत बरी झाली आणि तीने मुंबई सोडली आहे. ती मुंबईबाहेर असली तरी ती राज्यातील तसेच देशातील सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देत असते. यामुळे ती वादात सापडते.

आता तिच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. या प्रकरणी अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

यांच्या कार्याला सलाम! ८ महिन्यांच्या गरोदर असताना घरबसल्या बनवले कोरोना चाचणीचे किट

टीम इंडियाला चारीमुंड्या चीत करणाऱ्या बॉलरला दोन वेळच जेवण मिळेणा, अश्विनने केले मदतीचे आवाहन

तुमच्या भागात लस उपलब्ध आहे की, नाही Whatsapp वर कळणार; ‘ह्या’ नंबरवर फक्त एक मेसेज करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.