अभिनेत्री जान्हवी कपूर अडकणार लवकरच लग्नबेडीत; लग्नाची झाली पूर्ण तयारी

मुंबई। अनेक अभिनेत्र्या या करिअर च्या मागे असल्याने बऱ्याचदा लग्नाचा विषय काढला की तो टाळतात. कारण त्यांना इतर कामाची चिंता असल्याने त्या लग्नाचे विषय तितकसे गांभीर्याने घेत नाहीत. मात्र अशी एक अभिनेत्री आहे, जिने चक्क लग्नच नाही तर नवरा कसा असेल हे देखील सांगितलं आहे.

एका मुलाखती दरम्यान तिने स्वतःच्या लग्नाची पुर्ण तयारी करून ठेवल्याचे सांगितले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही अभिनेत्री कोण? तर या अभिनेत्रीचं नाव आहे श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर. जानव्ही कपूरला आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहे. मात्र जानव्हीला आता खऱ्या आयुष्यात जोडीदार पाहिजे आहे.

तिने दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःच्या लग्नाची पूर्ण तयारी करून ठेवल्याचे सांगितले आहे. जान्हवी म्हणाली की, माझं लग्न तिरूपतीमध्ये व बॅचलरेट पार्टी कॅप्री येथे झाली पाहिजे. पुढे ती म्हणाली ‘रिसेप्शन गरजेचं आहे का?’ नसेल तरी काही हरकत नाही?’. तसेच ‘लग्नाचं डेकोरेशन पारंपरिक पद्धतीतचं असायला हवं. मोगऱ्याची फुलं आणि मेणबत्तीने सजवलेलं असावं.

2 दिवसांत लग्न पूर्ण व्हायला हवं.’ ‘लग्नात मी कांजीवरम साडी नेसेल आणि ती पूर्ण गोल्ड असेल. मेंहदीसाठी गुलाबी रंगाचा ड्रेस असेल. त्यानंतर संगीतमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल. त्यानंतर जान्हवी म्हणाली, ‘माझ्या लग्नात खुशी आणि वडील भावूक झाले तर त्यांना अंशूला कपूर सांभाळून घेईल.’

तसेच मुलाखती दरम्यान तिला नवऱ्याबद्दल विचारले असता ती म्हणाली, ‘माझा पती समजदार असायला हवा. कारण मी अशा एकाही व्यक्तीला भेटली नाही.’ जान्हवीच्या या गोष्टी ऐकून असं वाटतं की तिने लग्नाची पूर्ण तयारी केली आहे. फक्त मुलगा भेटायला थोडा उशिर आहे. अशी पूर्ण तयारी जान्हवीने सांगितली आहे.

त्यामुळे जानव्हीला कधी नवरा मुलगा सापडणार व तो कसा असेल हे पाहण्यासाठी जानव्हीसोबत चाहते देखील उत्सुक आहेत. जानव्हीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर जान्हवीने आतार्यंत 4 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘धडक’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या जान्हवीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
 महत्वाच्या बातम्या
‘राज कुंद्राला बॉलिवूडप्रमाणे पॉर्न इंडस्ट्रीला मोठं बनवाचं होतं’ ‘ या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
नेहरुंनी १९४७ रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणामुळेच महागाई वाढली – भाजप मंत्र्याचे वक्तव्य
मोठी बातमी! पूजा चव्हाण प्रकरणातील ‘ते’ कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती? राठोड यांच्या अडचणीत वाढ
नितेश राणेंनी जाहीर केली शिवसेनेतील बाटग्यांची यादी; नावे वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.