खऱ्या आयुष्यात ‘अशी’ आहे चंद्र आहे साक्षीला मालिकेतील सुमन

सध्या टेलिव्हिजनवर अनेक मालिका गाजत आहेत. काही महिन्यांपासून अनेक नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. यातीलच एक मालिका म्हणजे कलर्स मराठीवरील ‘चंद्र आहे साक्षीला’. या मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे.

या मालिकेत मुख्य भुमिकेत सुबोध भावे आणि ऋतुजा बागवे दिसणार आहेत. त्यांच्या या नव्या जोडीला प्रेक्षक देखील खुप जास्त पसंत करत आहेत. आज आपण या मालिकेतील अभिनेत्री ऋतुजा बागवेबद्दल जाणून घेणार आहोत. .

ऋतुजा बागवेची ही पहिली मालिका नाही. ऋतुजाचा जन्म ९ सप्टेंबर १९८७ ला रायगडमध्ये झाला होता. तिचे शालेय शिक्षण देखील तिथेच पुर्ण झाले. तिला शाळेत असताना अभिनयात रुची निर्माण झाली होती. म्हणून तिने मोठी झाल्यानंतर अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला.

कॉलेजमध्ये आल्यानंतर ऋतुजाने एकांकिकांमध्ये भाग घेतला. एकांकिकांमूळे ऋतुजाला अनेक ऑफर आल्या. तिचा अभिनय अतिशय उत्तम होता. ऋतुजाला तिच्या उत्तम अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

ऋतुजाने ऑडीशन द्यायला सुरुवात केली. ‘तु माझा सांगाती’ ही ऋतुजाची पहिली मालिका होती. या मालिकेत ऋतुजाच्या अभिनयाचे खुप जास्त कौतुक करण्यात आले. तिच्या या भुमिकेला लोकांनी खुप पसंत केले. या मालिकेमूळे तिला खुप जास्त प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर ऋतुजाने झी मराठीवरील ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भुमिका निभावली. या मालिकेने ऋतुजाला घराघरात नेऊन पोहोचवले. ती अभिनेत्री म्हणून खुप प्रसिद्ध झाली. ऋतुजाने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

या मालिकेनंतर ऋतुजाचे ‘अनन्या’ हे नाटकं आले. हे नाटकं खुप प्रसिद्ध झाले. ऋतुजाच्या या नाटकाचे अनेक प्रयोग झाले. नाटकासोबतच ऋतुजाने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘शहीद भाई कोतवाल’ चित्रपटात तिने खुप महत्त्वाची भुमिका केली.

‘मन माझे’ या अल्बममध्ये देखील तिला खुप पसंत केले गेले. तिचा हा अल्बम खुप हिट झाला. ऋतुजाने आत्ता परत एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे. सध्या ऋतुजाची चंद्र आहे साक्षीला ही मालिका खुप गाजत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘ही’ व्यक्ती असेल अमिताभ बच्चनच्या २८०० कोटींच्या संपत्तीचा वारसदार

‘या’ व्यक्तीवर प्रेम करत होत्या लता दिदी; एका वचनामुळे लग्न होऊ शकले नाही

सुरैयाच्या प्रेमात पागल झाले होते देवानंद; पण ‘या’ गोष्टीमूळे लग्न होऊ शकले नाही

विराट कोहलीच्या आईने नकार दिला नसता तर आज ‘ही’ हॉट मुलगी त्याची पत्नी असती

कंगना राणावतची बोलती बंद करणाऱ्या दिलजीत दुसांजची खरी कहाणी वाचा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.