बॉलीवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ‘या’ हॉट आणि ग्लॅमर्स अभिनेत्रीने दिला बॉयफ्रेंडच्या बाळाला जन्म

फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेहमीच काहीतरी नवीन सुरू असते. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीतील लोकं नेहमीच चर्चेचा विषय बनतात. असेच काही बॉलीवूडचे देखील आहे. बॉलीवूडमध्ये काम करणारे कलाकार नेहमी काहीतरी वेगळा ट्रेंड सुरू करतात. ज्यामुळे ते लोकांमध्ये चर्चेचा विषय बनतात.

बॉलीवूडच्या अभिनेत्रींनी देखील असे अनेक नवनवीन ट्रेंड सुरू केले आहेत. कधी फॅशन तर कधी मेकअप. अभिनेत्री नेहमीच त्यांच्या फॅन्ससाठी काहीतरी नवीन आणि वेगळं करत असतात. पण काही वेळा त्यांनी सुरू केलेल्या ट्रेंडमूळे त्यांना लोकं नाव देखील ठेवतात.

असेच काही गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूड अभिनेत्रींसोबत होत आहे. कारण बॉलीवूडच्या काही अभिनेत्रींनी लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रींनी लग्नाच्या अगोदरच आपल्या बाळाला जन्म दिला आणि त्यांचा सांभाळ करत आहेत.

य गोष्टीमूळे प्रेक्षकांसोबतच फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील खळबळ उडाली होती. अभिनेत्रींना त्यांच्या या निर्णयामुळे खुप काही ऐकावं लागलं होतं. जाणून घेऊया बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला होता.

नीना गुप्ता – बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ताला सगळेजण ओळखतात. त्यानी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना वेडं लावले होते. त्यासोबतच त्यांना त्यांच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

८० च्या दशकात नीना गुप्ता विदेशी क्रिकेटरला डेट करत होत्या. त्या गर्भवती होत्या त्यावेळी दोघांचे ब्रेकअप झाले. पण नीना गुप्ताने हार मानली नाही. त्यांनी त्या बाळाला जन्म दिला आणि लग्न न करता आई झाल्या. आज त्यांची मुलगी बॉलीवूडची खुप मोठी फॅशन डिझायनर आहे.

एमी जॅक्सन – बॉलीवूडसोबतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या एमी जॅक्सनने देखील लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला. एमीने २०१९ मध्ये तिच्या बॉयफ्रेंडच्या मुलाला जन्म दिला.

एमी देखील बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे. जिने लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे लोकांनी तिला खुप नावे ठेवली होती. पण तिने कोणाचे ऐकले नाही. एमी अभिनय क्षेत्रापासून लांब राहून आपल्या मुलाचा सांभाळ करत आहे.

कल्की कोच्लिन – ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या कल्की कोचलिने देखील लग्नाच्या अगोदरच तिच्या बॉयफ्रेंडच्या मुलाला जन्म दिला आहे. कल्कीने स्वतः च्या इच्छेने हा निर्णय घेतला आहे.

कल्कीला ज्यावेळी लग्नाबद्दल विचारण्यात आले त्यावेळी ती म्हणाली की, ‘आमचा लग्न करण्याचा विचार झाला नाही. आम्हाला एकमेकांवर कोणतेही बंधन टाकायचे नाही. म्हणून आम्ही लग्न न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही लग्नाच्या बंधनात अडकू’.

महत्त्वाच्या बातम्या –

बापरे! लग्ना अगोदरच गरोदर होती महानायक अमिताभ बच्चनची छोटी मुलगी श्वेता बच्चन

आमिर खान आणि श्रीदेवीने कधीच एकत्र काम केले नाही; त्यामागे आहे ‘हे’ कारण

९० च्या दशकातील गाजलेल्या गायकाने घेतली शपथ, ‘यापुढे मी माझ्या मुलाला भेटणार नाही’

मनोजकुमारने डिंपलला रात्री १२ वाजता फोन करून हाॅटेलवर बोलावले व दिली ‘ही’ ऑफर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.