Share

लोकांनी मला लक्षात ठेवलं पाहिजे मग ते सेक्सी फोटो असो किंवा.., ईशा गुप्ताचे हैराण करणारे वक्तव्य

‘आश्रम 3’ ही वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता महत्वाच्या भूमिकेत आहे. सध्या अभिनेत्री ईशा गुप्ता ‘आश्रम 3′(Ashram 3) या वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री ईशा गुप्ताने ईशा गुप्ताने अनेक खुलासे केले आहेत. या मुलाखतीत अभिनेत्री ईशा गुप्ताने लाइमलाईटसाठी काय करावं लागलं यासंदर्भात माहिती दिली आहे. (actress esha gupta satement about photo)

या मुलाखतीत अभिनेत्री ईशा गुप्ता म्हणाली की, ” ज्यावेळी मी कोणतीही पोस्ट करते किंवा कोणतंही वक्तव्य करते, त्याची लगेच हेडलाईन बनते. हेडलाईनमध्ये राहणे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. लोक माझ्याबद्दल बोलतात हे माझ्यासाठी महत्वाचं आहे”, असे अभिनेत्री ईशा गुप्ताने मुलाखतीत सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/CbXYjClghdO/

अभिनेत्री ईशा गुप्ता मुलाखतीत पुढे म्हणाली की, “मी कोणते कपडे परिधान करते, मी काय खात आहे आणि मी कशाबद्दल बोलत आहे हे लोकांना जाणून घ्यायची इच्छा आहे. जेव्हापर्यंत लोकांना तुमच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते, तेव्हापर्यंत त्यांना तुमच्यामध्ये रस असतो. लोकांनी मला विसरले पाहिजे असे मला अजिबात वाटत नाही”, असे अभिनेत्री ईशा गुप्ता मुलाखतीत सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/CcmqXz0pp5_/

अभिनेत्री ईशा गुप्ता मुलाखतीत म्हणाली की, “लोकांनी मला फक्त लक्षात ठेवले पाहिजे असे मला वाटते. मग त्याचे कारण सेक्सी फोटो असोत किंवा शो असोत. फक्त लोकांनी मला लक्षात ठेवले पाहिजे”, असे अभिनेत्री ईशा गुप्ताने मुलाखतीत सांगितले आहे. यावेळी अभिनेत्री ईशा गुप्ताने मुलाखतीत बोल्ड फोटोसंदर्भात देखील मत व्यक्त केलं.

“मी असे फोटो पोस्ट करत नाही, जे शेअर करता येत नाहीत. जर मी काही बोल्ड फोटो शेअर केले माझ्या काही पोस्ट फिटनेस संदर्भात देखील असतात’, असे अभिनेत्री ईशा गुप्ताने सांगितले आहे. ‘आश्रम 3’ ही वेबसिरीज ३ जूनला रिलीज होणार आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ताने महत्वाची भूमिका साकारली आहे.

या मुलाखतीत अभिनेत्री ईशा गुप्ताने ‘आश्रम 3’ वेबसिरीज संदर्भात सांगितले की, “या वेबसिरीजमध्ये प्रत्येक कलाकाराची भूमिका महत्वाची आहे. अदितीची आणि त्रिशा चौधरींची देखील भूमिका महत्वाची आहे. या वेबसिरीजमधील बाबा निराला हे पात्र लोकप्रिय झाले आहे. मला या वेबसिरीजमधील भोपाची भूमिका फार आवडते”, असे अभिनेत्री ईशा गुप्ताने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
कॉन्सर्टनंतर असं काय झालं की केकेनं घेतला जगाचा निरोप? डोक्यावर जखमा आढळल्याने पोलीसही चक्रावले
VIDEO: एकच ह्रदय आहे कितीवेळा जिंकणार! धोनीने दिव्यांग चाहतीचे पुसले अश्रू, म्हणाला, रडू नकोस
सुशांत, सिद्धार्थ शुक्ला आणि सिद्धू मुसेवाला; ३ वर्षे, ३ मृत्यु आणि न सुटलेले ‘हे’ प्रश्न, चाहतेही झालेत हैराण

 

ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण

Join WhatsApp

Join Now